Shaakuntalam: महाकवी कालिदासची रचना पडद्यावर अवतरणार; Samantha Ruth Prabhu चा 'शाकुंतलम्' प्रदर्शनासाठी सज्ज

त्यामुळे या चित्रपटाबाबत ती उत्सुक आहे.

Shaakuntalam )संग्रहित संपादित प्रतिमा)

दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेत्री समंथा रुथ प्रभूची (Samantha Ruth Prabhu) महाकाव्यावर आधारीत प्रेम गाथा 'शाकुंतलम' (Shaakuntalam) लवकरच रिलीज होणार आहे. गुणशेखर दिग्दर्शित या चित्रपटात समंथा राणी शकुंतला देवीची भूमिका साकारत आहे. मंगळवारी, दिग्दर्शक गुणशेखर यांनी इंस्टाग्रामवर चित्रपटाविषयी एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी सांगितले की, लवकरच 'शाकुंतलम'चे प्रमोशन सुरू होणार आहे. 'शाकुंतलम'च्या माध्यमातून एक सुंदर प्रेमकथा सर्वांसमोर आणत असल्याचे त्यांनी लिहिले आहे.

चित्रपट फायनल होत असून चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान टीम सर्वांना भेटण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सप्टेंबरमध्ये, दिग्दर्शक गुणशेखर यांनी त्यांच्या दोन चित्रपटांचे अपडेट शेअर केले होते, जे- हिरण्यकश्यप आणि शकुंतलम होते. 'हिरण्यकश्यप' चित्रपटही मोठ्या प्रमाणावर बनवला जाणार असल्याची माहिती आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gunaa Teamworks (@gunaa_teamworks)

समंथाच्या 'शाकुंतलम'चे फर्स्ट लूक पोस्टर यावर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच करण्यात आले होते. चित्रपटाचे शूटिंग ऑगस्ट 2021 मध्येच पूर्ण झाले. या चित्रपटाबद्दल समंथा म्हणाली की, तिच्यावर नेहमीच पौराणिक कथा, पीरियड ड्रामा आणि राजे-राण्यांच्या जगाचा प्रभाव राहिला आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत ती उत्सुक आहे.

अभिज्ञानशाकुंतलम् ही महान कवी कालिदासाची रचना आहे. हा चित्रपट शकुंतला आणि दुष्यंत यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे, जो महाभारताच्या आदिपर्वाचे रूपांतर आहे. शाकुंतलममध्ये देव मोहन राजा दुष्यंतची भूमिका साकारत आहे, तर अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू अर्हा बाल राजकुमार भरतच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता कबीर दुहान सिंग राजा असुरच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय मोहन बाबू, सचिन खेडेकर, गौतमी, आदिती बालन, अनन्या नागल्ला आणि वर्षानी सुंदरराजन यांच्याही ‘शकुंतलम’मध्ये मुख्य भूमिका असणार आहेत.