अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) हिची सेक्सी फिगर (Sexy Figure) पाहून अनेक तरुणांचा कलेजा खलास होतो. सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिक्रिया पाहून तरी तसे वाटते. तर, अनेक मुलींना वाटते हिची फिगर इतकी सुंदर कशी? नोरासारखी सेक्सी फिगर आपल्यालाही कमावता आली तर? हा असंख्य तरुणींच्या मनात येणारा आणि मनातच विरुन जाणारा विचार. पण, केवळ विचारच न करता तुम्ही तो प्रत्यक्षातही उतरवू शकता. पण, त्यासाठी तुम्हाला आगोदर हे काही व्हिडिओ पाहावे लागतील. या व्हिडिओत नोरा फतेही हिच्या सेक्सी फिगरसोबतच तिचे Fitness Secrets (फिटनेस सिक्रेट) उलघडते. तिचा वर्कआऊट पाहिला की मग तुम्हाला तिने सेक्सी फिगर मिळविण्यासाठी केलेले कष्ट कळतील. तसेच, तुम्हालाही तशी फिगर हवी असल्यास काय करावे लागेल याबाबत काही मार्गदर्शन होऊ शकेल.
नोरा फतेही ही बॉलिवूडमधील आघाडीची सेक्सी बेली डान्सर आहे. सध्या ती 27 वर्षांची आहे. मादक आदा, हॉट डान्स आणि बातम्यांतून झळकणारी नोरा आपल्या फिटनेसबाबत प्रचंड काळजी घेते. पाहूया काय आहे तिचे Fitness Secrets.
प्रॉपर डाएट फॉलो न करताही फिगर मेंटेन
नोरा सांगते की, ती प्रॉप्र डाएट फॉलो करत नाही. तिच्या मनाला जे खावेसे वाटते ते ती खाते. ज्यात गोड पदार्थही असतात. पण, हे सगळे खाल्ले तरी आपला वर्कआऊट मात्र ती प्राधान्याने करते.
काय आहे फिटनेस रुटीन?
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नोरा पिलेट्स एक्सरसाइजची मदत घेतले. ज्यात शरीरातील ऑक्सीजनची पातळी योग्य राहते. रत्काभिसरण चांगले राहते. तसेच, शरीर विविध आजरांपासूनही मुक्त राहते.
बेली डान्स
नोरा सांगते की, तिला बेली डान्स फार आवडतो. त्यामुळे तिने आपल्या रेग्युलर फिटनेस रुटीनमध्येच त्याचा समावेश केला आहे. बेली डान्समुळे मसल्स बिल्डप होतात. सोबतच शरीरही लवचीक राहते. वजन कमी करण्यासाठीही बेली डान्स मोठी भूमिका बजावतो. (हेही वाचा, व्हिडिओ: दिलबर.. दिलबर.. गाण्यावर तरुणाचा डान्स, सुष्मिता सेन ते नोरा फतेहीची झलक)
पोल डान्स
बेली डान्सशिवाय नोराच्या Fitness Secretsमध्ये पोल डान्सचाही समावेश आहे. पोल डान्स केल्याने शरीरातील अनावश्यक कॅलरीज बर्न होतात. ज्यामुळे तुम्ही अधिक तंदुरुस्त राहता.
स्ट्रेच एक्सरसाईज
अॅक्ट्रॅक्टीव्ह फिगर मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तितका एक्सरसाईजही करावा लागतो. ज्यात स्ट्रेच एक्सरसाइजचाही समावेश होतो. नोरा फतेहीसुद्धा स्ट्रेट एक्सरसाइज करते. तोही भरपूर. स्ट्रेच एक्सरसाइज केवळ शरीलालाच तंदुरुस्त ठेवत नाही तर, तणावमुक्तीसाठीही महत्त्वाचा ठरतो असे ती सांगते.