Sant Tukaram Biopic: सुबोध भावे अभिनीत आदित्य ओम यांचा 'संत तुकाराम' 18 जुलै 2025 रोजी प्रदर्शित
संत तुकाराम यांच्यावर आधारित आदित्य ओम यांचा भव्य सिनेमा 'संत तुकाराम' 18 जुलै 2025 रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
दिग्दर्शक आदित्य ओम (Aditya Om Director) 17व्या शतकातील संत-कवी जगद्गुरु संत तुकाराम (Sant Tukaram) यांना सिनेमाद्वारे आजच्या जगापुडे ठेवणार आहेत. त्यामुळे संत तुकोबारायांचा जीवनप्रवास 'संत तुकाराम' (Sant Tukaram) चित्रपटाद्वारे हिंदी सिनेमाच्या पडद्यावर येणार आहे. चित्रपट येत्या 18 जुलै 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शानानंतर तो जगभरात उपलब्ध होणार आहे. चित्रपट ऐतिहासिक असून, त्याची कथा स्वतः आदित्य ओम यांनी लिहिलेली असून, सिनेमा मोठ्या प्रमाणात आणि भव्यतेने तयार केला जात आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave Movies) या सिनेमात संत तुकारामांची भूमिका साकारणार आहेत. त्यांच्या आध्यात्मिक परिवर्तनाचा आणि जनसामान्यांसाठी आवाज बनण्याचा प्रवास सिनेमाद्वारे उलगडणार आहे.
महाराष्ट्राच्या 17व्या शतकातील पार्श्वभूमीवर आधारित, हा सिनेमा तुकाराम महाराजांच्या दुःखद वैयक्तिक आयुष्यातून संत बनण्याचा, आणि त्यांच्या अभंग रचनांद्वारे समाजप्रबोधन करण्याच्या प्रवासावर आधारित आहे. या सिनेमात शिवा सूर्यवंशी, शीना चौहान, संजय मिश्रा, अरुण गोविल, शिशिर शर्मा, हेमंत पांडे, गणेश यादव, ललित तिवारी, मुकेश भट्ट, गौरी शंकर, ट्विंकल कपूर, रुपाली जाधव आणि DJ अकबर सामी यांच्यासारखे अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. (हेही वाचा, Exclusive: यापुढे बायोपिक करणार नाही- सुबोध भावे)
याशिवाय, ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना हे या सिनेमात निवेदक म्हणून दिसणार आहेत. ते संत तुकाराम यांच्या अध्यात्मिक प्रवासावर दार्शनिक दृष्टिकोनातून भाष्य करणार आहेत. हा सिनेमा बी. गौतम यांची Curzon Films आणि Purushottam Studios यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित करण्यात आला आहे. या सिनेमाचे संगीत निखिल कामत, रवी त्रिपाठी आणि वीरल आणि लावण यांनी दिले असून, अभंग संगीतातील पारंपरिक भाव टिकवून लोकसंगीत व शास्त्रीय संगीताचा उत्तम समन्वय साधण्यात आला आहे.
चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर
View this post on Instagram
शीना चौहान, या सिनेमात अवली जिजाबाई म्हणजे संत तुकारामांच्या पत्नीची भूमिका साकारणार असून, त्या या सिनेमाद्वारे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. सुबोध भावे यांनी त्यांच्या सहकलाकाराबद्दल सांगितले, ही माझी शीना सोबतची पहिलीच वेळ होती, पण ती सेटवर खूप प्रामाणिक वाटली. ती आपल्या भूमिकेबद्दल गांभीर्याने विचार करते आणि कामात लक्ष केंद्रीत ठेवते, हे तिच्या वागण्यातून स्पष्ट दिसून आलं. संतांच्या जीवनकार्याची गोडी आणि प्रेरणा देणारा हा सिनेमा, मराठी चित्रपटसृष्टीसाठी आणि भारतीय सिनेसृष्टीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

