सलमान खान याच्या Coronavirus वरील 'प्यार करोना' गाण्याची झलक; संपूर्ण गाणे 20 एप्रिल रोजी चाहत्यांच्या भेटीला (Watch Video)
लॉकडाऊनमुळे घरात अडकल्याने अनेकजण कंटाळले आहेत. दरम्यान बॉलिवूडचा भाईजान सलमान खान देखील पनवेल येथील फॉर्महाऊसवर अडकला आहे. मात्र चाहत्यांचे मनोरंजन करणे त्याने सोडलेले नाही.
देशावर ओढावलेल्या कोरोना व्हायरस च्या संकटामुळे नागरिक त्रस्त आहेत. तर लॉकडाऊनमुळे घरात अडकल्याने अनेकजण कंटाळले आहेत. दरम्यान बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) देखील पनवेल येथील फॉर्महाऊसवर अडकला आहे. मात्र चाहत्यांचे मनोरंजन करणे त्याने सोडलेले नाही. सलमान खान याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात सलमान खान याच्या 'प्यार कोरोना' गाण्याची झलक पाहायला मिळत आहे. हे गाणे सलमान खान याने गायले असून उद्या (20 एप्रिल) सलमानच्या युट्युब चॅनलवर हे गाणे रिलीज करण्यात येणार आहे.
या गाण्याची झलक इंस्टाग्रामवर शेअर करत सलमान खान याने लिहिले की, "मी हे गाणे उद्या माझ्या युट्युब चॅनलवर पोस्ट करत आहे. हे तुमचे आहे. बघुया तुम्ही ते सहज करु शकता की नाही?" सलमान खान याने रिक्रिएट केला 'मैंने प्यार किया' सिनेमातील सीन; पहा त्यातील कोरोना ट्विस्ट (Watch Video)
सलमान खान पोस्ट:
सलमान खानच्या या गाण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. लॉकडाऊनमुळे सलमानच्या क्रिएटिव्हीला अधिकच चालना मिळाली आहे. या काळात चाहत्यांसाठी सलमान अनेक नवनवे व्हिडिओज घेऊन येत आहे. यापूर्वी त्याने घोड्यांसह ब्रेकफास्ट करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. तर 'मैंने प्यार किया' मधील सीनला कोरोना ट्विट देत रिक्रिएट केला होता.