महेश मांजरेकर यांची मुलगी अश्वमी, 'दबंग 3' मधून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अश्वमी मांजरेकर दबंग 3 सिनेमामध्ये खास भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.
बॉलिवूडमध्ये सलमान खानने (Salman Khan) 'दबंग' सिनेमाच्या दोन सिक्वेन्समधून बक्कळ कमाई केल्यानंतर या सुपरहीट सीरिजचा तिसरा भाग (Dabangg 3) लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. यामध्ये आता महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांची मुलगी अश्वमी मांजरेकर (Ashwami Manjrekar) दिसणार असल्याची चर्चा मीडियामध्ये रंगली आहे. मात्र अद्याप याला दुजोरा देण्यात आला नाही. 'सलमान खान'ने दबंग 3 च्या शूटिंगला केली सुरूवात; पहा 'चुलबूल पांडे'ची पहिली झलक
DNA ने दिलेल्या रिपोर्टनुसार, सिनेमामाध्ये अश्वमी मांजरेकर एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमामध्ये सलमान खान विरूद्ध सोनाक्षी सिन्हा ही अभिनेत्री त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. तर नागीण फेम मौनी रॉयदेखील एका विशेष गाण्यामध्ये दिसणार आहे. आता नेमकी अश्वमीची भूमिका काय असेल? याची चर्चा रंगली आहे. 'दबंग 3' मधील सोनाक्षी सिन्हा हिचा लूक आऊट; पहा रज्जोची खास झलक (Photo)
अश्वमी मांजरेकर फोटो
सलमान खान आणि महेश मांजरेकर हे चांगले मित्र आहेत. सलमान खान महेश मांजरेकांना गंमतीमध्ये 'लकी मॉस्कॉट' मानतो. त्याच्या सिनेमात लहानशा स्वरूपात का होईना महेश मांजरेकरांची एन्ट्री असते. दबंग मध्येही महेश मांजरेकर होते. महेश मांजरेकरांच्या सिनेमामध्येही सलमान खानने एक मराठी गाणं गायलं होतं.
दबंग 3 सिनेमाचं पहिलं शेड्युल मध्य प्रदेशमध्ये पार पडलं आहे. येत्या ईदला सलमान खानचा 'भारत' सिनेमा रीलिज होणार आहे.