सलमान खान ही थिरकला प्रभुदेवा सोबत त्याच्या खास अंदाजात 'उर्वशी..' गाण्यावर; सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

मात्र शुटिंगमधून वेळ काढत प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दबंग 3 चा दिग्दर्शक प्रभू देवा (Prabhu Deva) सोबत सलमान 'उर्वशी..' या थिरकला आणि त्याचा खास व्हिडिओ त्याने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

Salman Khan and Prabhu Deva (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान (Salman Khan) सध्या 'दबंग 3' च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र शुटिंगमधून वेळ काढत प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दबंग 3 चा दिग्दर्शक प्रभू देवा (Prabhu Deva) सोबत सलमान 'उर्वशी..' या थिरकला आणि त्याचा खास व्हिडिओ त्याने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. सलमान खानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या सोबत सिने निर्माता साजिद नाडियालवाला (Sajid Nadiadwala) आणि अभिनेता किच्चा सुदीप (Kichcha Sudeep) यांनी देखील त्याला साथ दिली आहे.

सलमान खानचा खास व्हिडिओ

सलमान खानने हा व्हिडिओ शेअर करताना डान्स मास्टर प्रभु देवाकडूनच डान्सचे धडे घेतोय अशा आशयाचा मेसेज लिहला आहे. 'हम से है मुकाबला' या सिनेमातील उर्वशी या मूळ गाण्यात प्रभू देवा थिरकला होता. त्यांच्या खास अंदाजात असलेलं हे गाणं ए. आर. रेहमाननं संगीतबद्ध केलं आहे. मात्र आजही या गाण्याची भूरळ रसिकांवर आहे. आता सलमान पुन्हा या गाण्याच्या सिग्नेश्चर स्टेप्सवर थिरकला आहे. 'सलमान खान'ने दबंग 3 च्या शूटिंगला केली सुरूवात; पहा 'चुलबूल पांडे'ची पहिली झलक

सलमान खानचा 'दबंग 3' हा सिनेमा 20 डिसेंबर 2019 ला रसिकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सलमान खानसोबत सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे. या सिनेमाचे मागील दोन्ही भागांना रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता तिसर्‍या भागात काय होणार? याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif