Bharat च्या सेट्सवर सलमान खान जखमी, मुंबईत उपचारांसाठी परतला

मात्र सिनेमातील एका स्टंट सीन साठी जीममध्ये वर्क आउट करताना सलमान खानला हेअर लाईन फ्रॅक्चर झाले आहे.

Salman Khan at Mumbai airport File photo (Photo Credit: Yogen Shah)

2019 च्या ईदला सलमान खानचा 'भारत' (Bharat) सिनेमा रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी लुधियानामध्ये सुरु असलेल्या शूटिंगमधील एक खास फोटो सलमान खानने शेअर केला होता. मात्र आता सेटवर वर्क आउट करताना दुखापत झाल्याने सलमान  (Salman Khan) सक्तीच्या आरामासाठी मुंबईत आला आहे. व्यायामादरम्यान सलमान खानला दुखापत झाल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे.

लुधियानातील एका गावामध्ये सलमान खान (Salman Khan), कॅटरिना कैफ (Katrina Kaif) शूट करत होते. मात्र सिनेमातील एका स्टंट सीन साठी जीममध्ये वर्क आउट करताना सलमान खानला हेअर लाईन फ्रॅक्चर झाले आहे. उपचारासाठी सध्या सलमान खान भारतामध्ये आहे. लुधियानामध्ये वाघा बॉर्डरचा सेट उभारण्यात आला आहे. यापूर्वी ' भारत' सिनेमाचं शूटिंग माल्टामध्ये झालं आहे. सलमान खान - कॅटरिना कैफ पोहचले भारत -पाकिस्तान बॉर्डरवर, सलमानने शेअर केला खास फोटो

सलमान खान,कॅटरिना कैफ सोबतच या सिनेमामध्ये दिशा पटनी, तब्बू ,सुनील ग्रोवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. जॅकी श्रॉफ सलमान खानच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात सलमान खान वयाच्या विविध टप्प्यांवर विविध रूपात दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये 'भारत' सिनेमा बाबत खास आकर्षण आहे.

सलमान सध्या 'भारत' सिनेमाच्या बरोबरीने बिग बॉस १२ चं देखील शूटिंग करत आहे.