Salman Khan Begins Shooting For Radhe: सलमान खान ने 6 महिन्यांनंतर केली 'राधे' चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात; इन्स्टाग्रामवर शेअर केला खास फोटो
तब्बल साडेसहा महिन्यांनंतर सलमान खानने आपला टीव्ही शो बिग बॉस 14 च्या शुटिंगला सुरुवात केली आहे. याशिवाय सलमानने आपल्या प्रसिद्ध ‘राधे’ चित्रपटाच्या शुटिंगलादेखील सुरुवात केली आहे.
Salman Khan Begins Shooting For Radhe: बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे सलमान खान (Salman Khan) कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये त्याच्या पनवेलमधील फार्महाऊसमध्ये अडकला होता. तब्बल साडेसहा महिन्यांनंतर सलमान खानने आपला टीव्ही शो बिग बॉस 14 च्या शुटिंगला सुरुवात केली आहे. याशिवाय सलमानने आपल्या प्रसिद्ध ‘राधे’ चित्रपटाच्या शुटिंगलादेखील सुरुवात केली आहे. यासंदर्भात सलमानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शुटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमानने आपल्या चाहत्यांसाठी वेगळ्या स्टाईलमधील राधेची एक झलक दाखविली आहे. सलमानचा हा दबंग अंदाज सोशल मीडियावर खूपचं व्हायरल होत आहे.
सलमान खानने 2 ऑक्टोबरपासून कर्जत येथे ‘राधे’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभू देवाबरोबर शुटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटातील राधेची झलक आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करताना सलमानने म्हटलं आहे की, 'साडेसहा महिन्यानंतर पुन्हा शुटिंग सुरू केल्याने छान वाटतयं.' या फोटोमध्ये सलमान खान पाठ दाखवताना दिसत आहे. सलमानने डेनिम जॅकेच परिधान केले असून यावर 'धीस इस नॉट लुइस वीटॉन' असं लिहलं आहे. या फोटोवरून हा बाईक रेसिंग सीन असल्याचं समजतं. (हेही वाचा -Tamannaah Bhatia Tests Positive For COVID-19: दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया ला कोरोना विषाणूची लागण; उपचारासाठी रुग्णालयात दाखल)
View this post on Instagram
Back to shoot after 6 1/2 months ... feels good #Radhe
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on
प्राप्त माहितीनुसार, सलमान खानच्या राधे चित्रपटाचे शुटिंग कर्जतच्या एनडी स्टुडिओत सुरू आहे. त्यानंतर सलमानच्या वांद्रे घराजवळील 'मेहबूब स्टुडिओ'मध्ये या चित्रपटाचे पुढील चित्रीकरण होणार आहे. राधे चित्रपटात दिशा पटानी, रणदीप हूडा, गौतम गुलाटी आणि जरीना वहाब सलमान खानच्या सोबत दिसणार आहेत.