Salman Khan Buys New Bulletproof SUV: लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमक्यांनंतर सलमान खानने आपल्या सुरक्षेसाठी खर्च केले करोडो रुपये; दुबईहून खरेदी केली नवीन बुलेटप्रूफ कार
सलमान खानने दुबईहून एक नवीन एसयूव्ही खरेदी केली आहे जी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच सुरक्षित आहे
Salman Khan Buys New Bulletproof SUV: लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीकडून सतत धमक्या मिळाल्यानंतर बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) ने स्वत:चे संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त पावले उचलली आहेत. अलीकडेच त्याचा जवळचा मित्र राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर सलमान खानने त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. सलमानने त्याच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी दुबईहून नवीन बुलेटप्रूफ कार मागवली आहे. सलमान खानने दुबईहून एक नवीन एसयूव्ही खरेदी केली आहे जी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच सुरक्षित आहे.
प्राप्त माहितीनुसार, सलमानने स्वतःसाठी आणखी एक बुलेटप्रूफ निसान पेट्रोल एसयूव्ही खरेदी केली आहे. सलमानकडे आधीपासूनच बुलेटप्रूफ निसान पेट्रोल आहे आणि आता त्याने दुबईहून आणखी एक निसान पेट्रोल कार मागवली आहे. जी सुरक्षेच्या दृष्टीने जबरदस्त असून या कारची किंमत 2 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा -Salman Khan Threat Updates: अभिनेता सलमान खानकडे 5 कोटी रुपयांची मागणी; मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकीचा मेसेज)
मुंबईत राष्ट्रवादीचे नेते आणि सलमानच्या जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा बळकट करण्यात येत आहे. वास्तविक, सलमान खान दीर्घकाळापासून लॉरेन्स बिश्नोई टोळीचे लक्ष्य आहे. काही दिवसांपूर्वी सलमानच्या मुंबईतील घरावर गोळीबारही झाला होता. आता हे प्रकरण बाबा सिद्दिकीच्या हत्येनंतर आणखी चिघळले असून सलमान सध्या अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत बिग बॉसचे शूटिंग करत आहे.(हेही वाचा, Somy Ali Writes to Lawrence Bishnoi: सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिचे लॉरेन्स बिश्नोई यास खुले पत्र, ' मुझे आपसे बात करनी है')
निसान पेट्रोल कारची वैशिष्ट्ये -
सलमान खानने मागवलेली एसयूव्ही भारतात उपलब्ध नाही, त्यामुळे सलमान खानला ती दुबईहून मागावी लागली. या कारमध्ये जाड बुलेटप्रूफ काच, बॉम्ब अलर्ट सेन्सर आहेत. या SUV ला B6 किंवा B7 लेव्हल प्रोटेक्शन आहे, म्हणजेच यात 78 mm पर्यंत जाडीची काच आहे आणि ती बुलेटच्या फटका सहन करण्यास सक्षम आहे. निसान पेट्रोलमध्ये 5.6 लीटर V8 इंजिन आहे, जे 405 hp ची कमाल पॉवर आणि 560 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते. 7 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सने सुसज्ज असलेली, ही शक्तिशाली एसयूव्ही बरीच उंच आहे.
दरम्यान, एका ताज्या प्रकरणात सलमान खानसाठी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आला आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा जवळचा असल्याचे सांगितले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकीचा संदेश आला होता, ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोईशी असलेले त्याचे दीर्घकालीन वैर संपवण्यासाठी अभिनेता सलमान खानकडून 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने दावा केला आहे की, तो सलमान आणि लॉरेन्स टोळीमध्ये समेट घडवून आणेल. यासाठी त्याने पैसे मागितले असून जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट होईल, असा इशाराही दिला आहे.