Salman Khan Shirtless Photo: सलमान खान शर्टलेस फोटो सोशल मिडियावर झाला व्हायरल, फिट बॉडी पाहून चाहते झाले थक्क

आतापर्यंत या फोटोला 12 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत

Salman Khan Shirtless Photo (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) याच्यावर कोणताही लूक चांगलाच वाटतो. त्याला त्याचे चाहते वेगवेगळ्या लूकमध्ये पाहण्यास जितके उत्सुक असतात तितकेच त्याला शर्टलेस (Shirtless Photo) पाहण्यास देखील उत्सुक असतात. त्यामुळे चाहत्यांना निराश न करता त्यांचे मनोरंजन करण्यासाठी सलमानने नुकताच त्याचा एक शर्टलेस फोटो (Shirtless Photo) शेअर केला आहे. हा फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल (Social Media Viral Photo) होत आहे. या फोटोमध्ये शर्टलेस सलमान जिमनंतर आपली झालेली फिट बॉडी (Fit Body) दाखवत आहे.

सलमानने इन्स्टाग्रामवर आपला हा फोटो शेअर केला असून सध्या हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत या फोटोला 12 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हेदेखील वाचा- AK vs AK Controversy: अनिल कपूर याचा Netflix वरील ऐके विरुद्ध ऐके चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, IAF च्या युनिफॉर्मवरुन भारतीय हवाई दलाचा आक्षेप

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

या फोटोमध्ये सलमानची पिळदार शरीरयष्टी पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत. यात सलमानचा हॉट लूक सर्वांवर भुरळ पाडणारा आहे. सलमानला शर्टलेस पाहण्यात त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. सलमान जेव्हा शर्ट काढून आपली फिटनेस फ्लाँट करतो तेव्हा सर्वांनाच ते फार आवडते.

सलमानच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर, सलमान लवकरच दिशा पटानीसह 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटात दिसेल. हा चित्रपट 2021 ईदला प्रदर्शित केला जाईल.