Dabangg 3 Motion Poster: सलमान खानच्या 'दबंग' स्टाईल अंदाजात सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर भेटीला; 100 दिवसांनी होणार सिनेमा रीलीज

आज सलमान खानने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट द्वारा या सिनेमाची पहिली झलक शेअर केली आहे.

सलमान खान (Image Credit: Instagram)

सलमान खानच्या (Salman Khan) 'दबंग', 'दबंग 2' नंतर आता सलमान खान - सोनाक्षी सिन्हा ही जोडी 'दबंग 3' (Dabangg 3)हा सिनेमा घेऊन रसिकांच्या भेटीला येणार आहे. आजपासून ठीक 100 दिवसांनी म्हणजे 20 डिसेंबर रोजी 'दबंग 3' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. आज सलमान खानने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट द्वारा या सिनेमाची पहिली झलक शेअर केली आहे. 'स्वागत तो करो हमारा' असं म्हणत सलमान खानची दबंग 3 मधील खास झलक शेअर करण्यात आली आहे. दबंगच्या पहिल्या दोन्ही भागांना रसिकांकडून बॉक्सऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तिसर्‍या भागाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

दबंग 3 सिनेमाचं दिग्दर्शन प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभू देवा करणार आहे. सलमान खान, सोनाक्षी सिन्हा सोबतच या सिनेमामध्ये पंकज त्रिपाठी, अरबाज़ खान, सुदीप आणि माहि गिल या सिनेमामध्ये दिसणार आहेत. मुंबईच्या पावसात सलमान खान सायकलस्वारी करत पोहचला 'दबंग 3' च्या सेटवर (Watch Video)

दबंग 3 ची पहिली झलक 

 

View this post on Instagram

 

Aa Rahe Hain! Chulbul Robinhood Pandey. Theek 100 din baad. Swagat Toh Karo Humara! #100DaystoDabangg3 @arbaazkhanofficial @aslisona @saieemmanjrekar @prabhudheva @kichchasudeepa @nikhildwivedi25 @skfilmsofficial @saffron_bm @kjr_studios #AdityaChowksey @sureshproductions #GlobalCinemasLLP

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

दबंग 3 सिनेमामध्ये सलमान खान सोबत महेश मांजरेकरांची लेक देखील खास भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील तिच्या लूकबाबत सलमानसह सार्‍या क्रु मेम्बर्स कडून गुप्तता पाळण्यासाठी खास खबरदारी घेतली जात आहे. महेश मांजरेकर आणि सलमान खान यांच्यामधील मैत्री जगजाहीर आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानने 'बिग बॉस मराठी 2' मध्ये हजेरी लावत स्पर्धकांना सरप्राईज दिलं होतं. तसेच महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमाच्या एका गाण्याचं अनावरण केलं होतं.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif