सलमान खान समोर मराठमोळ्या चिमुकलीचं देशभक्तीपर भाषण (Watch Video)
त्याचबरोबर त्याचं फॅन फॉलोईंगही जबरदस्त आहे. त्याला इम्प्रेस करण्यासाठी चाहते काय करतील, हे सांगता येत नाही.
सलमान खान चं (Salman Khan) लहान मुलांवरील प्रेम आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. त्याचबरोबर त्याचं फॅन फॉलोईंगही जबरदस्त आहे. त्याला इम्प्रेस करण्यासाठी चाहते काय करतील, हे सांगता येत नाही. एका मराठमोळ्या लहान मुलीने तर दबंग खान समोर चक्क मराठीतून भाषण केले आहे. सलमान खानने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (योगदिनी सलमान खान याचा स्विमिंग पूल मध्ये स्टंट; व्हिडिओची सोशल मीडियात धूम)
मराठमोळ्या चिमुकलीचे हे भाषण देशभक्तीपर आहे. तिचे भाषण आणि आत्मविश्वास पाहिल्यानंतर खुद्द सल्लू देखील टाळ्या वाजवून तिचे कौतुक करताना व्हिडिओत दिसत आहे. 'बच्चे बच्चे मे है भारत' असं लिहित सलमानने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
सलमान खान याची पोस्ट:
काही दिवसांपूर्वीच सलमान खानच्या भारत सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्यानंतर आता सलमान 'दबंग 3' च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून लवकरच तो संजय लीला भन्साली यांच्या 'इंशाअल्लाह' (Inshallah) या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.