Salman Khan ने 'या' कारणासाठी धुडकावली होती वेबसीरिज काम करण्याची 250 कोटींची ऑफर, अभिनेता प्रभुदेवा ने केला खुलासा
मात्र सलमान त्या सर्व धुडकावल्या. लोकांनी आपला चित्रपट थिएटर्समध्ये जाऊनच पाहावा यासाठी तो नेहमी आग्रही होते.
लॉकडाऊन मुळे सिनेमागृह मागील 7-8 महिने बंद आहेत. आता हळूहळू थिएटर्स सुरु होत आहे. या दरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्मचा चाहतावर्ग प्रचंड वाढला. त्यामुळे असंख्य महत्त्वाचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित झाले. मात्र आपले चित्रपट कायम सिनेमागृहातच प्रदर्शित व्हावे यासाठी आग्रही असलेल्या अभिनेता सलमान खानने (Salman Khan) आपला आगामी चित्रपट 'राधे' सिनेमागृहातच प्रदर्शित करण्याचे ठरवले. त्याचा मित्र अभिनेता प्रभु देवा (Prabhu Deva) याने याबाबत माहिती दिली असून त्याने सलमानबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
प्रभूदेवाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, सलमाननला त्याचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित व्हावा यासाठी अनेक प्लॅटफॉर्म्सनी मोठमोठ्या ऑफर्स दिल्या होत्या. मात्र सलमान त्या सर्व धुडकावल्या. लोकांनी आपला चित्रपट थिएटर्समध्ये जाऊनच पाहावा यासाठी तो नेहमी आग्रही होते.
हेदेखील वाचा- Prabhu Deva दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात; मुंबईमधील फिजिओथेरपिस्ट डॉ. हिमानीशी मे महिन्यात पार पडला लग्नसोहळा
याच दरम्यान सलमानला तेजीत असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसीरिजमध्ये काम करण्याची ऑफर्स देखील होती. ही ऑफर्स जवळपास 250 कोटींची होती. मात्र सलमानही ही ऑफर देखील नाकारली. कारण ओटीटी कंटेंटपेक्षा त्याला आपला चित्रपट थिएटरमध्ये लागणं महत्वाचं वाटतं. डिजिटल कंटेटमध्ये काम करण्यासाठी त्याला अनेकांनी ऑफर्स दिल्या होत्या. मात्र सलमानने त्या सर्व नाकारल्या.
लॉकडाऊनच्या काळात त्याने स्वत:चे युट्यूब चॅनल काढले. गाणं प्रदर्शित केले. सॅनिटायजर आणि मास्क देखील आणले. मात्र याच लॉकडाऊनमध्ये तेजीत असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे मात्र त्याने सपशेल पाठ फिरवली. तसा सलमान खानचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्यामुळे सलमानचा चित्रपट म्हटला की मनोरंजन होणार याबाबत शंका नाही. त्यामुळे आपल्या सिनेमाची मजा प्रेक्षकांनी घरात न बसता थिएटर्समध्येच घ्यावी अशी माहितीही त्यांनी दिली आहे.