Salman Khan Death Threat: '2 कोटी द्या, नाहीतर मारून टाकू'; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

धमकीचा संदेश मिळाल्यानंतर वरळी जिल्हा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Salman Khan (फोटो सौजन्य - फेसबुक)

Salman Khan Death Threat: मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) ला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आली आहे. ही धमकी मुंबई वाहतूक पोलिसांना मेसेजद्वारे देण्यात आली आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने करोडोंची खंडणीही मागितली आहे. या मेसेजनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. याआधीही लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

दोन कोटी रुपयांची खंडणी -

दोन कोटी रुपये न दिल्यास सलमान खानला मारले जाईल, असा संदेश मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाला देण्यात आला होता. धमकीचा संदेश मिळाल्यानंतर वरळी जिल्हा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, वरळी वाहतूक पोलिसांना अज्ञात व्यक्तीने दोन धमकीचे संदेश पाठवले आहेत. वरळी पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 354 (2), 308 (4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा -Salman Khan Threat Updates: अभिनेता सलमान खानकडे 5 कोटी रुपयांची मागणी; मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकीचा मेसेज)

झीशान सिद्दीकीला जीवे मारण्याची धमकी -

यापूर्वी, मंगळवारी मुंबई पोलिसांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि दिवंगत बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांना धमकीच्या कॉल प्रकरणी नोएडा येथे एका 20 वर्षीय व्यक्तीला अटक केली. मोहम्मद तय्यब उर्फ गुरफान खान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आरोपीला नोएडा येथील सेक्टर 39 येथून अटक करण्यात आली. धमकीशिवाय आरोपी मोहम्मद तय्यब उर्फ ​​गुरफानने झीशान सिद्दीकी आणि सलमान खान यांच्याकडेही पैसे मागितले होते. (हेही वाचा -Zeeshan Siddique Receives Threat Call: झीशान सिद्दीकीला धमकीचा फोन...सलमान खानचा उल्लेख, पैशांची मागणी; वांद्रे पूर्व कार्यालयात आला फोन)

बाबा सिद्दीकी यांची हत्या -

12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दिकी यांची झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हत्या करण्यात आली होती. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif