Zeeshan Siddique Receives Threat Call: झीशान सिद्दीकीला धमकीचा फोन...सलमान खानचा उल्लेख, पैशांची मागणी; वांद्रे पूर्व कार्यालयात आला फोन

दिवंगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गेल्या आठवड्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आता त्यांचा मुलगा झीशान सिद्दीक याला धमकीचा फोन आल्याचे समजत आहे. फोनमध्ये सलमान खानचा उल्लेख करण्यात आला आहे.

Zeeshan Siddique Receives Threat Call: झीशान सिद्दीकीला धमकीचा फोन...सलमान खानचा उल्लेख, पैशांची मागणी; वांद्रे पूर्व कार्यालयात आला फोन
Photo Credit- X

Zeeshan Siddique Receives Threat Call: दिवंगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामुळे सध्या देशभरात वातावरण तापले आहे. अनेक संशयितांना अटक झाल्या आहे. आता बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीक (Zeeshan Siddique) याला धमकीचा फोन आल्याचे समजत आहे. फोनमध्ये सलमान खानचा उल्लेख करण्यात आला आहे. झीशान सिद्दीक याला मुंबईतील वांद्रे पूर्व येथील त्याच्या कार्यालयात धमकीचा फोन आला. ज्यात बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) नावाचाही उल्लेख करण्यात आला. अहवालानुसार, कॉलरने पैशाची मागणी केली आहे. या धमकीनंतर, मुंबई पोलिसांनी मंगळवारी 29 ऑक्टोबर रोजी झीशान सिद्दीक आणि सलमान खान या दोघांना धमक्या दिल्याच्या आरोपाखाली नोएडा येथील गुफरान खान या 20 वर्षीय विद्यार्थ्याला अटक केली. तपास सध्या सुरू आहे. पोलीस धमकी देण्यामागचे कारण शोधत आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 29, 2024 01:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).