Salman Khan Brand FRSH: सलमान खानने लॉन्च केला पर्सनल ब्रँड 'फ्रेश'; 'सॅनिटायझर्स'पासून सुरुवात, जाणून घ्या किंमत
सलमानने आपल्या नविन व्यावसायिक उपक्रमात, FRSH ब्रँड अंतर्गत सॅनिटायझर्स (Sanitizers) लॉन्च केले आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने अभिनयासह आता आणखी एका व्यवसायात पाऊल टाकले आहे. सलमानने आपल्या नविन व्यावसायिक उपक्रमात, FRSH ब्रँड अंतर्गत सॅनिटायझर्स (Sanitizers) लॉन्च केले आहे. या बॉलिवूड मेगास्टारने त्याचा नवा ब्युटी आणि पर्सनल केअर ब्रँड FRSH, 24 मे रोजी लाँच करण्याची घोषणा केली. एका व्हिडीओ मेसेजमध्ये सलमान खानने सांगितले की, नुकतेच त्याने FRSH नावाचा ब्रँड बाजारात आणला आहे. सुरुवातीला या ब्रँड अंतर्गत सुवासिक द्रव्ये बनवण्याची योजना आखली होती, परंतु सध्याच्या काळाच्या गरजेनुसार सलमान खानने सॅनिटायझर बाजारात आणले आहेत.
सलमान खान ट्वीट -
कोरोना व्हायरस महामारीमुळे, सध्या सॅनिटायझर्सना जास्त मागणी आहे. जगभरात या प्राणघातक रोगापासून बचाव करण्यासाठी, सॅनेटायझिंग हा एक महत्त्वाचा उपाय सांगितला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, सध्या 54 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि 3.45 दशलक्षांहून अधिक कोविड-19 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सलमानने आपल्या ब्रँड अंतर्गत एक नवा सॅनिटायझर्स सादर केला आहे. या उत्पादनाबाबतचा एक व्हिडिओ सलमान खानने सोशल मिडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये सलमान या सॅनिटायझर्सचा वापर करताना दिसत आहे.
Amitabh B, Sara Ali Khan, Sonam Kapoor सेलेब्रिटींनी दिल्या चाहत्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा - Watch Video
सलमानने पुढे सांगितले की, 'सॅनिटायझरनंतर डीओडोरंट्स, बॉडी वाइप्स आणि परफ्यूम्स यासारख्या इतर वस्तूही या ब्रँडखाली बाजारात आणल्या जातील. सध्या FRSH सॅनिटायझर्स (जे 72 टक्के अल्कोहोल-आधारित आहेत) अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत, परंतु नंतर ते स्टोअरमध्येही उपलब्ध होतील.' दरम्यान, FRSH वेबसाइटनुसार सॅनिटायझरच्या 100 मिली लिटरच्या बाटलीची किंमत 50 रुपये आणि 500 मिली लिटर सॅनिटायझरच्या बाटलीची किंमत 250 रुपये आहे. वेबसाइटनुसार कॉम्बो सेट खरेदी करताना 10 ते 20 टक्के सूट देण्यात येणार आहे.