सलमान खान ने लॉकडाऊन उल्लंघन करणार्‍यांना फटकारले; तुम्ही इतके बहादुर आहेत की तुमच्या कुटुंबीयांना 'खांदा' देऊ शकाल?

पनवेल येथील फार्महाऊसमध्ये अडकलेल्या सलमान खानने लॉकडाऊनचं उल्लंघन करणार्‍यांना खडे बोल सुनावले आहेत.

सलमान खान (Photo Credits: Instagram)

भारतामध्ये आता कोरोनाग्रस्तांची संख्या 12 हजारांच्या पार गेली आहे. देशातील सद्यस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लॉकडाऊन 15 एप्रिलच्या पुढे आता अजून 19 दिवस वाढवला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी अद्याप औषध नसल्याने नाईलाजास्तव 'लॉकडाऊन'चा पर्याय स्वीकारावा लागत आहेत. मात्र अशाकाळातही काही बेपर्वाईने वागणार्‍या लोकांमुळे संकटाचा धोका वाढत असल्याने बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान (Salman Khan) याने भारतीयांना पुन्हा कोरोना व्हायरस संकटाचं गांभीर्य समजून घ्या आणि घरात सुरक्षित रहा असा सल्ला दिला आहे. पनवेल येथील फार्महाऊसमध्ये अडकलेल्या सलमान खानने लॉकडाऊनचं उल्लंघन करणार्‍यांना खडे बोल सुनावले आहेत. सोबतच कोरोना विरूद्धच्या लढ्यात जीवावर उदार होऊन सेवा देणार्‍या पोलिस, डॉक्टर, नर्स सह बॅंक कर्मचार्‍यांचे आभार मानले आहेत. एका खास व्हिडिओच्या माध्यमातून सलमान खानने आपला हा व्हिडिओ मेसेज शेअर केला आहे.

सलमान खान दोन दिवसांच्या सुट्टीसाठी आई, दोन्ही बहिणी आणि त्यांच्यामुलांसोबत पनवेलला आला होता. मात्र अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने त्याला तिथेच रहावं लागत आहे. दरम्यान अशा परिस्थितीमध्येही आम्ही एक नियम बनवला आहे. कुणी इथून बाहेर जाणार नाही आणि बाहेरून इथे येणार नाही. दरम्यान हाच नियम आता सगळ्यांनी काटेकोरपणे पाळायची गरज आहे. काही मोजक्या लोकांच्या बेशिस्त आणि बेफिकीर वृत्तीमुळे देशात परिस्थिती बिघडत आहे. वेळीच सगळ्यांनी लॉकडाऊन काटेकोरपणे पाळला असता तर सारेच मोकळे झाले असते. पण काहींना या संकटाचं गांभीर्य अजून समजत नसल्याने विनाकारण ते रस्त्यांवर फिरत आहेत आणि पोलिसांना त्यांच्यावर कडक कारवाई करत आहेत.

सलमानचा भारतीयांना व्हिडीओ मेसेज

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

लॉकडाऊनचं उल्लंघन करण्यात ज्यांना बहादुरी वाटत आहे त्यांच्यामध्ये इतकी बहादुरी आहे का? की जे त्यांच्या चुकीमुळेच त्यांच्या प्रियजनांची तिरडी उचलू शकतील? 'राम नाम...' म्हणत त्यांना कायमचं गमवू शकतील? कोरोना व्हायरसवर सध्या उपचार नाहीत त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये लोकांचा मूर्खपणा सार्‍यांना संपण्याचं कारण ठरू शकतं. असं सांगत कृपया लॉकडाऊनचं पालन करा आणि घरात बसा असं आवाहन सलमान खानने केलं आहे. यासोबतच रूग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी धडपड करणार्‍या डॉक्टरांवरील हल्ल्याचाही सलमान खानने निषेध केला आहे. प्रार्थना, नमाज घरच्या घरीच करा. माणसांतच देव आहे ही लहानपणी आपल्याला दिलेली शिकवण आठवा. असं सांगत सलमान खानने सार्‍यांना सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे.

सलमान खानने कोरोना व्हायरसच्या या संकटात सिनेक्षेत्रात काम करणार्‍या बॅकस्टेज आर्टिस्ट, तंत्रज्ञ आणि इतर कामगारांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत त्यांना आर्थिक मदत केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif