Radhe: Salman Khan आणि Disha Patani चे रोमँटिक गाणे ‘सीटी मार’ 'या' दिवशी होणार रिलीज
सलमान खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित हा चित्रपट यंदा ईदच्या निमित्ताने 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
Radhe: सलमान खान (Salman Khan) चा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ चा ट्रेलर निर्मात्यांनी 22 एप्रिल रोजी रिलीज केला होता. ज्यामध्ये सलमानचा वॉन्टेड अवतार दिसला होता आणि तो सोशल मीडियावर चर्चेत आला होता. चाहत्यांना चित्रपटाचा ट्रेलर आवडला असला तरी ते त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत.
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सलमान खान आणि दिशा पटानी Disha Patani) यांच्या 'सिटी मार' (Seeti Maar) या गाण्याची झलक पाहायला मिळाली. त्यांच्या रोमँटिक गाण्याचे सीनही यात दाखवण्यात आले. त्यानंतर आता चाहते हे गाणे रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. आज सलमान खान फिल्म्सने सोशल मीडियावर हे गाणे सोमवारी प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे. (वाचा - कोविड-19 च्या भीतीपोटी Rakhi Sawant ने PPE किट घालून केली भाजी खरेदी; पहा मजेशीर Videos)
'सिटी मार' हे गाणं दमदार नृत्य आणि रोमँटिक दृश्यांनी भरलेले आहे. या गाण्यात निर्माते सलमान आणि दिशाची रोमँटिक केमिस्ट्री सादर करणार आहेत. या ट्रॅकचे संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिले असून शब्बीर अहमद या गाण्याचे गीतकार आहेत. या गाण्याला कमल खान आणि इलिया वंतूर यांनी आपला आवाज दिला आहे. तर शेख जानी बाशाने हा पेप्पी डान्स नंबर कोरिओग्राफ केला आहे.
सलमान खान सोबत दिशा पटानी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई' सलमान खान फिल्म्सने झी स्टुडिओसमवेत सादर केला आहे. सलमान खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित हा चित्रपट यंदा ईदच्या निमित्ताने 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट झी -5 वर 'पे-पर-व्ह्यू' सर्व्हिस झी प्लेक्सवर दिसू शकतो.