सलमान खान - ऐश्वर्या रायचा 'हम दिल दे चुके सनम' अभिषेक बच्चनचा आवडता रोमॅन्टिक सिनेमा
1999 साली आलेला सलमान खान आणि ऐश्वर्याचा 'हम दिल दे चुके सनम' हा सिनेमा अभिषेकचा सर्वात आवडता रोमॅन्टिक सिनेमा आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय जोडी आहे. या दोघांचा ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन रोमॅन्टिक अंदाज नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र जेव्हा एका चॅट शो दरम्यान अभिषेक त्याच्या आवडत्या रोमॅन्टिक सिनेमाविषयी विचारण्यात आलं तेव्हा अभिषेकने दिलेले उत्तर हे अनेकांसाठी एक धक्का आहे. अभिषेक बच्चनला सलमान खान आणि ऐश्वर्याचा 'हम दिल दे चुके सनम' हा सिनेमा आवडतं असल्याचं सांगितले आहे.
ऐश्वर्या राय, सलमान खान आणि अजय देवगण अशा लव्ह ट्रॅगलमध्ये असलेला 'हम दिल दे चूके सनम' या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भंसाळी यांनी केलं आहे. या सिनेमाच्या सेटवरच ऐश्वर्या आणि सलमानमध्ये जवळीक निर्माण झाल्याची चर्चा आहे. मात्र सलमान - ऐश्वर्याचे प्रेमप्रकरण फार काळ टिकू शकलं नाही. दोघांमध्ये वाद झाल्याने अल्पावधीतच त्यांचं नातं संपुष्टात आलं.
सलमान खान आणि ऐश्वर्या बच्चनमध्ये वाद आजही कायम आहेत. हम दिल दे ... या सिनेमानंतर त्यांनी कोणत्याच सिनेमात एकत्र काम केले नाही. तसेच बॉलिवूड पार्ट्या, इतर कार्यक्रमांमध्येही सलमान - ऐश्वर्या लांब राहतात.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय कालांतराने एकत्र आले. सिनेमाच्या सेट्सवरून फुलली प्रेमकहाणी पुढे लग्नात रूपांतरीत झाली. मात्र आजही अभिषेकला ऐश्वर्या - सलमानचा ' हम दिल दे..' हा सिनेमा आवडता रोमॅन्टीक सिनेमा तसेच ऐश्वर्या अभिनित आवडीच्या सिनेमांपैकी एक आहे.