Salman Khan 55th Birthday: कोविड 19 परिस्थितीचं भान ठेवत यंदा वाढदिवसानिमित्त गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गर्दी न करण्याचं सलमान खान चं चाहत्यांना आवाहन

दरवर्षी सलमान खानचे चाहते त्याच्या वाढदिवसानिमित्त वांद्रे येथील त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर तासन तास उभे राहून एक झलक पाहण्यासाठी ताटकळत उभे असतात. पण यंदा सलमान खानने त्याच्या चाहत्यांना कोरोना परिस्थितीचं भान ठेवत आपल्या घराबाहेर गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे.

Salman Khan 55th Birthday | Photo Credits: Twiiter/ Rahul Kanal and Salman Khan

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान (Salman Khan) यंदा 27 डिसेंबर दिवशी 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. दरवर्षी सलमान खानचे चाहते त्याच्या वाढदिवसानिमित्त वांद्रे येथील त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट (Galaxy Apartment)  बाहेर तासन तास उभे राहून एक झलक पाहण्यासाठी ताटकळत उभे असतात. पण यंदा सलमान खानने त्याच्या चाहत्यांना कोरोना परिस्थितीचं भान ठेवत आपल्या घराबाहेर गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. त्याच्या घराबाहेर तशाप्रकारचा फलक लावण्यात आला आहे.

सलमान खान यंदा त्याचा बर्थ डे अत्यंत साधेपणाने साजरा करणार आहे. सध्या सलमान महेश मांजरेकर दिग्दर्शित 'अंतिम' सिनेमाच्या शुटिंगमध्ये आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, उद्या, 55 व्या वाढदिवसानिमित्त सलमान त्याच्या 'राधे' सिनेमाची रिलीज डेट जाहीर करू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Antim- The Final Truth: सलमान खान सोबत Fight करतानाचा आयुष शर्मा चा व्हिडिओ आला समोर; पहा ‘अंतिम- द फाइनल ट्रुथ’ चित्रपटाचा टीझर.

Tweet

सलमान खानने लॉकडाऊनचे सुरूवातीचे काही महिने पनवेल येथील त्याच्या फार्म हाऊसवर काढले होते. त्यावेळेसही त्यांना चाहत्यांसोबतच सार्‍या नागरिकांना कोरोना संकटकाळात नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यांच्या खास अंदाजामध्ये केलं होतं. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर हळूहळू सलमान खानने कामाला सुरूवात केली आहे. सुरूवातीला राधे सिनेमाचं उरलेलं चित्रीकरण पूर्ण केले आहे. त्यानंतर बिग बॉसचं सूत्रसंचलन आणि त्यानंतर आता अंतिमचं शूटिंग सुरू आहे. अंतिमची खास झलक काही दिवसांपूर्वीच त्याने चाहत्यांसोबत सोशल मीडीयात शेअर केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif