Saif Ali Khan Turns 50: करीना कपूर हिने हटके स्टाईलमध्ये दिल्या सैल अली खान याला 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! (Watch Video)
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याचा आज 50 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मित्रमंडळी, नातेवाईक, चाहते यांच्याकडून होत असताना करीना कपूर खान हिचे सैफच्या वाढदिवसाचे जोरदार सेलिब्रेशन केले आहे
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याचा आज 50 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मित्रमंडळी, नातेवाईक, चाहते यांच्याकडून होत असताना करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिचे सैफच्या वाढदिवसाचे जोरदार सेलिब्रेशन केले आहे. या सेलिब्रेशनचे काही खास फोटोज आणि व्हिडिओज समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी सैफ-करीना यांनी दुसऱ्या बाळाच्या गुड न्यूज दिली होती. त्यानंतरही सोशल मीडियातून त्यांच्यावर शुभेच्छांचा भडिमार झाला. दरम्यान करीनाने सेलिब्रेशनचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात करीना बेबी बंप (Baby Bump) फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या बातमीनंतर पहिल्यांदा करीना कपूरने बेबी बंपसह फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटोज चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस पडले असून सोशल मीडियावर हिट ठरत आहेत. तुम्हीही पहा सैफच्या बर्थडे सेलिब्रेशनचे खास क्षण आणि हटके व्हिडिओ... (करीना कपूर कडे 'Good News' असल्याचे ऐकून आनंदून गेले वडिल रणधीर कपूर; पाहा काय म्हणाले)
पहा फोटोज:
पहा व्हिडिओ:
करीनाच्या गर्ल गँग अमृता अरोरा आणि मलायका अरोरा यांनी देखील सोशल मीडियावर सैफ सोबतचे फोटो पोस्ट करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर चाहत्यांकडूनही वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ट्विटरवर देखील सैफ ट्रेंड होत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2020 02:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

