RRR: प्रदर्शनापुर्वी RRR कायदेशीर अडचणीत, तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल, जाणून घ्या प्रकरण
RRR चित्रपटाविरोधात तेलंगणा उच्च न्यायालयात (Telangana High Court) जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली असून, चित्रपटाच्या प्रदर्शनाला बंदी घालण्याची मागणी आल्याचे वृत्त आहे.
एसएस राजामौली (S.S Rajamouli) यांचा आगामी चित्रपट आरआरआर (RRR) रिलीज होण्यापूर्वीच सुपरहिट असल्याचे सांगत आहेत. हा चित्रपट आज म्हणजेच 7 जानेवारीला प्रदर्शित होणार होता, मात्र निर्मात्यांनी कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले. आता चित्रपट रिलीज होण्याआधीच आलिया भट्ट, (Aliya Bhatt) अजय देवगण, (Ajay Devgan) राम चरण, (Ram Charan) ज्युनियर एनटीआर (Jn. NTR) हे स्टार चित्रपटात कायदेशीर अडचणीत अडकल्याचे दिसत आहे. RRR चित्रपटाविरोधात तेलंगणा उच्च न्यायालयात (Telangana High Court) जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली असून, चित्रपटाच्या प्रदर्शनाला बंदी घालण्याची मागणी आल्याचे वृत्त आहे.
RRR या चित्रपटाविरोधात तेलंगणा उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली आहे. वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील एका राहणाऱ्या विद्यार्थ्याने चित्रपटाविरोधात जनहित याचिका दाखल केली असून चित्रपटात ऐतिहासाची मोडतोड करुन विपर्यास करण्यात आला आहे. या विद्यार्थ्याने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या चित्रपटात दोन स्वतंत्र सैनिक अल्लूरी सीता रामराजू आणि कोमाराम भीम यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचं या विद्यार्थ्यानं आपल्या याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देऊ नये, असेही याचिकेत म्हटले आहे.
न्यायाधीश उज्ज्वल बायन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यानंतर त्यांनी ही जनहित याचिका असून त्यावर सरन्यायाधीशांच्या खंडपीठामार्फत सुनावणी होणार असल्याचे सांगितले आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणीची प्रतीक्षा आहे. (हे ही वाचा Pushpa The Rise: पुष्पाच्या हिंदी डिजिटल प्रीमियरसाठी करावी लागणार प्रतीक्षा, ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांची माहिती)
या प्रकरणावर RRR मेकर्सकडून कोणतेही विधान नाही
मात्र, या प्रकरणी अद्यापतरी आरआरआर मेकर्सकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. या चित्रपटात राम चरण अल्लुरी सीताराम राजू यांची भूमिका साकारत आहे. त्याचवेळी, ज्युनियर एनटीआर चित्रपटात कोमाराम भीमच्या भूमिकेत आहे.
चित्रपट सत्य घटनांवर आधारित - एसएस राजामौली
एसएस राजामौली यांनी कधीही असा युक्तिवाद केला नाही की हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित नाही आणि नेहमी स्पष्ट केले की हे सत्य पात्रांवर आधारित काल्पनिक काम आहे. त्या दोन स्वातंत्र्यसैनिकांच्या आयुष्यात काय घडले हे अनेक वर्षे कोणालाही माहीत नव्हते आणि राजामौली यांनी त्यांची कथा त्या भूमिकेवर आधारित आहे.