Rocky Aur Rani Ki Prem Kahani Controversy: रॉकी और रानी की प्रेम कहानी' तील 'या' आक्षेपार्ह सीनवर सेन्सॉर बोर्डाने लावली कात्री

करण जोहरचा आगामी चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' 28 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. सगळ्यांनाच हा चित्रपट सुपरहिट होईल अशी आशा आहे.

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Controversy: रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट सद्या चर्चेत रंगला आहे.  बऱ्याच वर्षांनंतर करण जोहरने (Karan Johar) या चित्रपटासाठी दिग्दर्शनात कमबॅक केलं आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंगची जोडी पुन्हा एकदा झळकणार आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची गाणी हिट झाली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनासाठी रणवीर आणि आलिया व्यस्त आहे. या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. सेंसॉर बोर्डने या चित्रपटातील काही सीनवर कात्री लावली आहे.  चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. पंरतु चित्रपटासाठी काही सीनवर आक्षेप घेण्यात आला आहे.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'  या फॅमिली ड्रामामध्ये आलिया भट्ट, रणवीर सिंगसह जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. रिलीजपूर्वी, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने चित्रपटाची समीक्षा केली. (CBFC)ने  या चित्रपटासाठी अनेक बदल करण्याचा सल्ला निर्मात्यांना दिला आहे.  तसेच वादग्रस्त शब्दांवर आक्षेप नोंदवत ते शब्द चित्रपटातून हटवण्यात आले आहेत. चित्रपटात अनेक वेळा बी डी असा अपमानास्पद शब्द वापरण्यात आला आहे.तो शब्द हटवण्यात आला आहे.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील एका सीनमध्ये नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. या आक्षेपार्ह सीनमुळे युजर्समध्ये चांगली चर्चा रंगली आहे. ट्रेलरमध्ये हा सीन पाहायला मिळाला. या सीनमध्ये  लक्ष रवींद्रनाथ टागोर यांच्याकडे फोटोकडे जाते आणि तो त्यांना रानीचे आजोबा म्हणून त्यांचा पाया पडतं असतो. हा सीन विनोदी शैलीतून दाखवण्यात आला आहे. हे सीन पाहून नेटकऱ्यांना खटकलं. त्यावरून युजर्संनी  दिग्दर्शक करण जोहरला सुनावलं होतं. करण जोहरने यंदा त्यांच्या करियरची २५ वर्ष पुर्ण केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now