Happy Birthday Genelia D'Souza: रितेश देशमुख याने पत्नी जेनेलिया डिसूजा ला सोशल मिडियावर हटक्या अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाचा पोस्ट
आज जेनेलियाचे पती रितेश देशमुख हटके अंदाजात आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Happy Birthday Genelia Deshmukh: 'तुझे मेरी मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या अभिनेत्री जेनेलिया डिसूजा (Genelia Dsouza) हिचा आज 33वा वाढदिवस. मुख्य म्हणजे या चित्रपटातूनच जेनेलिया आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) ची लव्हस्टोरी सुरु झाली. ज्याचे रुपांतर लग्नात झाले. रितेश आणि जेनेलिया ही गोड जोडी बॉलिवूडमधील टॉप कपल्सपैकी एक आहे. तसेच हे दोघे सोशल मिडियावर देखील बरेच सक्रिय असल्यामुळे नेहमी चर्चेत असतात. म्हणूनच आज जेनेलियाचे पती रितेश देशमुख हटके अंदाजात आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हृदयाला स्पर्शून जाणा-या या पोस्टमध्ये रितेशने जेनेलियाला मिठी मारतानाचा एक क्युट फोटो शेअर केला आहे. या पोस्टखाली "तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, माझे हास्य, माझी क्राईम पार्टनर आहेस. माझी मार्गदर्शक, माझा उत्साह, माझा प्रकाश, माझे जीवन, माझे सर्वकाही तूच आहेस. जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्यासोबत मोठे होणे हे एक आशीर्वादासारखे आहे", असे लिहिले आहे.
हेदेखील वाचा- The Life After Life: अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी मृत्यूनंतर अवयव दान करण्याचे घेतला निर्णय; पाहा संपूर्ण व्हिडिओ
सांगायचेच झाले तर, रितेश देशमुखला जेनेलिया टाळायची. तिला वाटायचे, "रितेश मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे, त्यामुळे त्याचे वागणे थोडे कणखर वृत्तीचे असेल. मात्र तुझे मेरी मेरी कसम चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. चित्रपट संपल्यानंतर ते एकमेकांना मिस करु लागले. इथूनच त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली.
अखेर 2012 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले. 9 वर्षाच्या रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. यावेळी ते दोघे 'तेरे नाल लव हो गया' या चित्रपटाचे शूटिंग करत होते.