अभिनेता रितेश देशमुखने लग्नाच्या वाढदिवसानंतर दुसऱ्याच दिवशी पत्नी जनेलियाला सांगितलं, 'मी दुसऱ्या कुणावर तरी प्रेम करतो'; पहा व्हायरल व्हिडिओ
सोमवारी त्यांच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाली. लग्नाच्या वाढदिवसानंतर दुसऱ्याचं दिवशी रितेशने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रितेशने जेनेलियाला 'मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत असल्याचा' खुलासा केला आहे.
बॉलिवूड सर्वाधिक चर्चेत असलेली मराठमोळी जोडी म्हणजे रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांनी 3 फेब्रुवारीला आपल्या लग्नाचा 8 वा वाढदिवस साजरा केला. सोमवारी त्यांच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाली. लग्नाच्या वाढदिवसानंतर दुसऱ्याचं दिवशी रितेशने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये रितेशने जेनेलियाला 'मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत असल्याचा' खुलासा केला आहे. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल. परंतु, रितेश आणि जेनेलियाने गंमत म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना रितेशने 'हा स्टंट तुम्ही घरी युज करू नका', असा सल्लाही दिला आहे. (हेही वाचा - अभिनेता रितेश देशमुख ने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या 'बायको' जेनेलिया ला शुभेच्छा देत शेअर केला व्हिडिओ, गाणे ऐकून तुम्हालाही होईल हसू अनावर)
रितेश देशमुख व्हिडिओ -
या व्हिडिओमध्ये जेनेलियाने रितेशला 'आय लव्ह यू' म्हटलं आहे. तेवढ्यात रितेशने जेनेलियाला 'मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत असल्याचं' सांगितलं आहे. हे ऐकल्यानंतर जेनेलियाने रितेशला पुन्हा 'काय म्हणाला'? असं विचारलं आहे. यावर पुढील धोका लक्षात घेऊन रितेशने जेनेलियाला सारवासारव करत 'दुसऱ्या कुणावर म्हणजे तुझ्या हसण्यावर प्रेम करत असल्याचं' म्हटलं आहे. यावर जेनेलिया खूश झालेली पाहायला मिळत आहे. त्यानंतर रितेशने 'मौत को झुके ट्क से वापस आ सकता हू', असं म्हटलंय. हा फनी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.