Riteish Deshmukh Birthday Special : खास हळव्या इंस्टाग्राम पोस्ट मधून Genelia ने रितेशला दिल्या 40 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

17 वर्षांपूर्वी जिनिलिया (Genelia Deshmukh) आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांची भेट 'तुझे मेरी कसम' (Tujhe Meri Kasam)या सिनेमाच्या सेट्सवर झाली.

Riteish Deshmukh 40 th Birthday Special (Photo Credit: Instagram)

Riteish Deshmukh 40 th Birthday : 'माऊली' रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आज 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. जगभरातून रितेश देशमुखवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यापैकी एक खास आणि हळवी बर्थ डे पोस्ट म्हणजे रितेशची पत्नी जिनिलिया देशमुखची (Genelia Deshmukh) बर्थ डे पोस्ट ! इंस्टाग्राम या लोकप्रिय फोटो शेअरिंग सोशल मीडिया अ‍ॅपवर जिनिलियाने रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना 17 वर्ष जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

जिनिलियाची खास इंस्टाग्राम पोस्ट

17 वर्षांपूर्वी जिनिलिया आणि रितेश देशमुख यांची भेट 'तुझे मेरी कसम' (Tujhe Meri Kasam)या सिनेमाच्या सेट्सवर झाली. तेथे 17 वर्षांपूर्वी जिनिलिया आणि रितेशने एकत्र रितेशचा बर्थ डे साजरा केला होता. बघता बघता इतकी वर्ष उलटली. रितेशचा प्रत्येक वर्षी वाढदिवस खास असतो असे जिनिलियाने म्हटलं आहे. सोबत जिनिलियाने दोन खास फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

Dear Forever I still remember celebrating your birthday on Tujhe Meri Kasam sets.. 17years ago.. Time flies and I have had the opportunity to celebrate so many of your birthdays through all these years..Your birthday will always be most special to me cos it’s the day the world got its best creation and that creation is my partner through thick and thin.. I Love you and i will take every opportunity to remind you of how much I do.. Happy Birthday @riteishd

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) on

2012 साली रितेश आणि जिनिलिया देशमुखचा शाही विवाहसोहळा झाला. ख्रिश्चन आणि भारतीय अशा दोन्ही संस्कृतीमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. रितेश आणि जिनिलिया यांच्या आयुष्यात आता रिआनआणि रायल हे दोन चिमुकले आहेत.

सध्या रितेश देशमुखच्या मुंबई फिल्म कंपनीमध्ये जिनिलिया देशमुख निर्माती म्हणून काम पाहते. 'लय भारी' आणि 'माऊली' या सिनेमाच्या निर्मिती जिनिलियाने सांभाळली होती. या दोन्ही मराठी सिनेमांमध्ये खास गाण्याच्या माध्यमातून रितेश आणि जिनिलिया ही जोडी मराठी सिनेमांमध्ये झळकली होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now