RIP Wajid Khan: सलमान खान चे ईद विशेष 'भाई भाई' गाणं ठरलं वाजिद खान च्या कामाची शेवटची आठवण (Watch Video)
साजिद वाजीद या जोडगोळीने आजवर बॉलिवूड मध्ये अनेक गाण्याना संगीत दिले आहे. अलीकडेच ईद च्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेले सलमान खान (Salman Khan) याचे विशेष भाई भाई (Bhai Bhai) हे गाणे वाजिद खान याचे शेवटचे काम ठरले.
बॉलिवूड च्या प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद- वाजिद (Sajid- Wajid) मधील वाजिद खान (Wajid Khan) याचे आज वयाच्या 43 व्या वर्षी निधन झाले आहे. किडनीच्या आजाराने ट्रस्ट असताना हॉस्पिटल मध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते अशातच कोरोनाची बाधा (Coronavirus) सुद्धा झाल्याने त्याचे आज सकाळी निधन झाले. प्रसिद्ध गायक सोनु निगम याने सुरुवातीला माहिती दिली आणि त्यांनतर बॉलिवूड मधील अनेक कलाकार मंडळींनी सुद्धा वाजिद खान यांच्या यावेळी जाण्याची दुःख व्यक्त करत त्याच्यासोबतचच्या आठवणी शेअर केल्या आहेत.-साजिद वाजीद या जोडगोळीने आजवर बॉलिवूड मध्ये अनेक गाण्याना संगीत दिले आहे. अलीकडेच ईद च्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेले सलमान खान (Salman Khan) याचे विशेष भाई भाई (Bhai Bhai) हे गाणे वाजिद खान याचे शेवटचे काम ठरले. RIP Wajid Khan: प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये पसरली शोककळा, अमिताभ बच्चन, प्रियंका चोपड़ा पासून फराह खानसह अनेकांनी व्यक्त केले दु:ख
साजिद वाजिद या दोघांनी सलमान खानच्या अनेक चित्रपटही गाण्यांना म्युझिक दिले आहे. दबंग साठी केलेलं गाणी तर ऑल टाइम हिट झाली होती. नांतर आता कोरोनामुळे लागू झालेल्या लॉक डाऊन मध्ये सलमान खान याने बनवलेल्या दोन्ही गाण्यांना सुद्धा याच दोघांनी या संगीत दिले होते. सुरुवातीला सलमानचे Pyaar Korona' आणि त्यांनतर भाई भाई ही सोनंही गाणी साजिद वाजिद यांच्याकडून बनवण्यात आली होती. आज वाजिद खान याच्या निधनानंतर सलमान ने सुद्धा ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे.
सलमान खान ट्विट
Wajid Vil always love, respect, remember n miss u as a person n ur talent, Love u n may your beautiful soul rest in peace ...
— Salman Khan (@BeingSalmanKhan) June 1, 2020
सलमान खान भाई भाई गाणं (पहा व्हिडीओ)
दरम्यान,वाजिद खान याच्या पार्थिवाववर आज वर्सोवा येथे अंतिमसंस्कार केले जाणारं आहेत. काही वेळेपूर्वीच त्याचे पार्थिव याठिकाणी आणण्यात आले असून अंत्यदशनांसाठी अनेक बॉलिवूड कलाकार मंडळींनी याठिकाणी गर्दी केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 01, 2020 01:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

