RIP Sushant Singh Rajput: WWE स्टार जॉन सीना याने सोशल मीडियात पोस्ट करत सुशांत सिंह राजपूत याला वाहिली श्रद्धांजली
सुशांतच्या निधनाबाबत आता WWE स्टार जॉन सीना याने सुद्धा आपले दु:ख जाहीर केले आहे.
RIP Sushant Singh Rajput: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी आत्महत्या केल्याची बातमी सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेली आहे. सिनेसृष्टीत शोककळा परसल्याचे दिसून आले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बॉलिवूड कलाकार शाहरुख खान, सलमान, अक्षय कुमार, सारा अली खान, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट यांच्यासह अन्य दिग्गज मंडळींनी सुशांतच्या आत्महत्येबाबत आपले दु:ख व्यक्त केले आहे. सुशांतच्या निधनाबाबत आता WWE स्टार जॉन सीना याने सुद्धा आपले दु:ख जाहीर केले आहे.(RIP Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूत च्या पोस्टमोर्टम रिपोर्ट नुसार गळफासानेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट; कोरोना चाचणीतुन झाले 'हे' निदान)
जॉन सीना याने सुशांत याचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोला कोणतेच कॅप्शन दिलेले नाही. खरंतर जॉन सीना त्याचे इंन्स्टाग्रामवर फोटो कॅप्शन शिवाय पोस्ट करतो. तर ऋषि कपूर आणि इरफान खान यांच्या निधनाच्या वेळी सुद्धा जॉन सीना याने त्याच्या इंन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत श्रद्धांजली दिली होती.(Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्याचे वृत्त कळताच अंकिता लोखंडेने दिली 'अशी' प्रतिक्रिया)
सुशांत वर आज मुंबईत अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुशांत याच्या परिवारातील मंडळी मुंबईत दाखल झाली आहेत. तर मुंबई पोलिसांना सुशांत याच्या घरातून तो डिप्रेशन मध्ये असल्याची एक फाइल मिळाली आहे. गेल्या 6 महिन्यापासून तो याचा सामना करत होता. परंतु सुशांतला आर्थिक चणचण भासत होती का या संदर्भात तपासून पाहण्यासाठी पोलिसांकडून त्याच्या खात्याची अधिक माहिती मिळवत आहेत.
मुंबई पोलीस प्रवक्ता डीसीपी प्रणय अशोक यांनी असे म्हटले आहे की, सुशांत याच्या आत्महत्येबाबत अधिक तपास करण्यात येत आहे. तसेच अद्याप कोणतीही सुसाईट नोट हाती लागली नसल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.