Rhea Chakraborty Arrested: रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर वकील सतीश मानेशिंदे यांची पहिली प्रतिक्रिया , 'रियाने व्यसनाधीन व्यक्तीवर प्रेम केले ही तिची चूक'

जिने व्यसनाधीन, मानसिक आजार असणार्‍या आणि चूकीच्या औषधांच्या, ड्रग्जच्या अधीन जाऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्या व्यक्तीवर प्रेम केले आहे.

Rhea Chakraborty | Photo Credits: Twitter/ ANI

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दिवसागणिक रोज नवनवे खुलासे होत आहेत. आज सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty)  NCB कडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्यानंतर तिचे वकील सतीश मानेशिंदे (Lawyer Satish Maneshinde) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सतीश मानेशिंदेंच्या मते, ' न्यायाचा प्रवास बघा, 3 केंद्रीय यंत्रणा एका महिलेच्या मागे लागल्या आहेत. जिने व्यसनाधीन, मानसिक आजार असणार्‍या आणि चूकीच्या औषधांच्या, ड्रग्जच्या अधीन जाऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्या व्यक्तीवर प्रेम केले आहे. दरम्यान सतीश मानेशिंदे यांनी सुशांत सिंह राजपूत मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचं आणि व्यसनाधीन असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान रिया एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली आहे. तिची रूग्णालयामध्ये काही वैद्यकीय चाचणी केली जाईल. तसेच मीडीया रिपोर्टनुसार, एनसीबी तिची रिमांड न घेण्याची शक्यता आहे. परंतू यापूर्वीच सुशांतचा स्टाफ मेम्बर सॅम्युअल मिरांडा आणि रियाचा भाऊ शौविक चतुर्वेदी एनसीबीच्या अटकेमध्ये आहे.

ANI Tweet

रियाने काल डॉ. कुमार आणि सुशांतची बहीण प्रियंका रजपूत यांच्यावर खोटी मेडिकल प्रिसक्रिब्शन दिल्याचा आरोप लावत मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान सतिश मानेशिंदे हे ज्येष्ठ वकील आहेत. त्यांनी अनेक सलमान खान, संजय दत्त अशा  बॉलिवूड सेलिब्रिटींची कायदेशीर लढाई लढली आहे. रियाच्या प्रकरणामध्येही त्यांनी रिया सार्‍या चौकशींना समोर जाईल. तसेच तपास यंत्रणांना सहकार्य करेल असे म्हटले होते.