Rhea Chakraborty Sent to 14 Days Judicial Custody: रिया चक्रवर्तीची जामीन याचिका फेटाळल्यामुळे सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; NCB ने केली होती अटक

याबाबत गेले तीन दिवस सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) चौकशी सुरु होती.

रिया चक्रवर्ती (Photo Credits: Instagram)

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या (Sushant Singh Rajput Death Case) चौकशीत ड्रग्जचा (Drug) मुद्दा समोर आला आहे. याबाबत गेले तीन दिवस सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) चौकशी सुरु होती. आता या चौकशीनंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीने (NCB) रिया चक्रवर्तीला अटक केली आहे. रियाची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. कोरोनाची तपासणी केली गेली, ती नकारात्मक आली. त्यानंतर रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे. जामीन अर्ज फेटाळल्यामुळे रियाला ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

रियाविरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 सी आणि 28 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांखाली शिक्षा 6 महिने ते 10 वर्षांपर्यंत असू शकते. या कायद्याच्या कलम 29 चा संदर्भही आहे, जो गुन्हेगारी कारस्थान मानला जातो. रिया चक्रवर्तीच्या अटकेबाबत बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, ड्रग पेडलरसोबत तिचे संबंध होते, म्हणूनच तिला अटक केली गेली आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या चौकशीत सुशांत सिंह राजपूत केसमधील ड्रग प्रकरणामध्ये रियाचा संबंध असल्याचे निष्पन्न झाले होते.

यापूर्वी रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती याला ड्रग खरेदीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. आज एनसीबीने शोविक आणि मिरांडाला समोर बसवून रियाची चौकशी केली. (हेही वाचा: शौविक च्या अटकेने संतप्त झालेल्या वडिल इंद्रजीत चक्रवर्ती यांनी सोडले मौन, म्हणाले- तुम्ही एका मध्यमवर्गीय कुटूंबाला उद्ध्वस्त केलत)

रियाच्या अटकेनंतर माध्यमांना उद्देशून एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा ​​म्हणाले की, रियाच्या कुटुंबीयांना अटकेची माहिती देण्यात आली आहे. रियाला तिच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून मिळालेली माहिती आणि यापूर्वी अटक करण्यात आलेल्या लोकांच्या विधानांच्या आधारे अटक करण्यात आली आहे. रिया विरुद्ध एनसीबीकडे भक्कम पुरावे आहेत. त्यानंतर आता रियाचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे तिला 14 दिवसांची, म्हणजेच 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif