Remo D'Souza सह 'Dance 3' मधील सुपरहिट गाण्यावर थिरकली त्याची डॉक्टरांची टीमही, पाहा जीममधील Viral Video
त्यावेळी त्याच्यासोबत असलेली डॉक्टरांची टीमही त्याच्यासोबत या गाण्यावर थिरकताना दिसली
'बत्तमीज, सेल्फी ले ले रे, बलम पिचकारी' यांसारखी एकाहून सुपरहिट गाण्यांवर आपल्या नृत्याविष्काराची भर पाडणारा बॉलिवूडमधील उत्कृष्ट कोरिओग्राफर रेमो डिसूजा (Remo D'Souza) काही दिवसांपूर्वी रुग्णालयातून इलाज घेऊन घरी परतला. त्याला मागील महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. या बातमीने त्याच्या कुटूंबियांसहित त्याच्या चाहत्यांच्या पायाखालची जमिन सरकली. अनेक लोक त्याच्यासाठी प्रार्थना करत होते. अखेर त्यांच्या चाहत्यांच्या प्रार्थनांमुळे आणि रेमोच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तो बरा झाला. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तो सध्या आपल्या डॉक्टरांच्या टीमचा सल्ला घेऊन जीम करत आहे. मात्र आता जीममध्ये त्याने त्याच्या जीव ज्यात अडकला आहे ती गोष्ट म्हणजेच डान्स करतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे आणि यात गंमत म्हणजे त्याने त्याच्यासह असलेल्या डॉक्टरांच्या टीमला देखील डान्स करायला लावले.
रेमो आपल्या डॉक्टरांच्या टीमसह डान्स 3 मधील 'मुकाबला' या गाण्यावर नाचताना दिसत आहे. त्यावेळी त्याच्यासोबत असलेली डॉक्टरांची टीमही त्याच्यासोबत या गाण्यावर थिरकताना दिसली.हेदेखील वाचा- Remo D'Souza हार्ट सर्जरी नंतर पहिल्यादाचं पोहोचले जीम; दमदार वापसीचा व्हिडिओ पाहून चाहते झाले खूश
पाहा व्हायरल व्हिडिओ
या व्हिडिओखाली 'डान्स हे जीवनातील आनंद आहे आणि जीवन जगण्याचा एक उत्तम पर्याय आहे. माझी काळजी घेणा-या सर्व डॉक्टरांचे धन्यवाद. तुम्ही खूप महान आहात. मला लवकर बरा करण्यासाठी डान्स करणे हाच सर्वात सोपा मार्ग आहे' असे कॅप्शन त्याने लिहिले आहे.
रेमो डिसूजा कोकिलाबेन रुग्णालयातील कार्डियाक रिहॅबमध्ये रिकव्हरीसाठी जात आहे. त्यावेळी त्याच्या सोबत त्याची डॉक्टरांची टीमदेखील असते. फिटनेस संबंधी आणि व्यायामासंबंधी योग्य ती माहिती त्याची ही टीम त्याला वारंवार देत असते.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रेमोने बॉलिवूडमध्ये पार्श्वभूमी डान्सर म्हणून सुरुवात केली. त्यानंतर रेमोने बर्याच चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शनही केले. रेमोने 'फ़ालतू' चित्रपटाद्वारे दिग्दर्शन केले आणि त्यानंतर त्यांनी 'एबीसीडी', 'एबीसीडी 2' आणि सलमान खान स्टारर फिल्म 'रेस' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.