Shilpa Shetty आणि Raj Kundra यांना उच्च न्यायालयाकडून ED च्या बेदखल नोटीसविरोधात दिलासा, काय आहे नेमके प्रकरण? वाचा
त्यानंतर शिल्पा शेट्टी यांचे हे फार्महाऊस एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास यंत्रणेने तात्पुरते जप्त केले होते.
शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात नवे अपडेट समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) या दाम्पत्याला अंतरिम दिलासा दिला आहे. यापूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांना त्यांचे घर रिकामे करण्यासाठी नोटीस पाठवल्यानंतर शिल्पा आणि राज यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर शिल्पा शेट्टी यांचे हे फार्महाऊस एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास यंत्रणेने तात्पुरते जप्त केले होते.
परंतु, आता त्यांच्या अपीलावर निर्णय होईपर्यंत ईडी या नोटिसांची अंमलबजावणी करणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे की, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अपीलावर आदेश येईपर्यंत ते निष्कासन नोटीस लागू करणार नाहीत. (हेही वाचा - ED Attached Raj Kundra Properties: राज कुंद्रा यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता ईडीकडून जप्त)
शिल्पा-राजला उच्च न्यायालयाकडून दिलासा -
हे प्रकरण प्रॉपर्टी ॲटॅचमेंटशी संबंधित आहे, ज्यामध्ये ईडीने शिल्पा आणि राज यांना मुंबई आणि पुण्यातील घरे खाली करण्याची नोटीस बजावली होती. परंतु आता पुढील आदेश येईपर्यंत त्यांना घर सोडावे लागणार नाही. अंमलबजावणी संचालनालयाने मुंबई उच्च न्यायालयात म्हटले आहे की, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अपीलावर अंतिम निर्णय होईपर्यंत ते बेदखल करण्याच्या नोटीसची अंमलबजावणी करणार नाहीत. (हेही वाचा - Raj Kundra ने पत्नी Shilpa Shetty पासून विभक्त होण्याच्या अफवांचं केलं खंडन; UT 69 अभिनेत्याने इंस्टावरील व्हिडिओ पोस्ट शेअर करत दिलं स्पष्टीकरण)
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला ED कडून घर रिकामे करण्याची नोटीस -
प्रत्यक्षात, 27 सप्टेंबर रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शिल्पा शेट्टी आणि कुंद्रा यांना मुंबईतील जुहू येथील घर आणि पुण्यातील फार्म हाऊस 10 दिवसांच्या आत रिकामे करण्याची नोटीस बजावली होती. याविरोधात या दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. एवढेच नाही तर ही नोटीस रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्याचवेळी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पी.के.चव्हाण यांच्या खंडपीठाने गुरुवारी याप्रकरणी निकाल देताना शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना स्थगितीचा अर्ज करण्यास परवानगी दिली.