Rashmika Mandanna Confirms Her Relationship: खाजगी फोटो लीक होताच रश्मिका मंदान्नाने दिली आपल्या नात्याची कबुली; लग्नाच्या प्रश्नावर दिले 'हे' उत्तर, पहा व्हिडिओ

तो रश्मिकासोबत लंच डेट एन्जॉय करताना दिसला होता. त्यांच्या लंच डेटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Rashmika Mandanna, Vijay Deverakonda (फोटो सौजन्य - X/@deeptom10)

Rashmika Mandanna Confirms Her Relationship: पुष्पा 2 स्टार रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) अल्लू अर्जुनच्या चित्रपटात श्रीवल्लीच्या भूमिकेत परतणार आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर रश्मिका आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) लोकांची मने जिंकत आहेत. त्यांनी लवकरच लग्न करावे, अशी चाहत्यांची इच्छा आहे. अनेकदा त्या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी विजयने आपण रिलेशनशिपमध्ये असल्याची पुष्टी केली होती. तो रश्मिकासोबत लंच डेट एन्जॉय करताना दिसला होता. त्यांच्या लंच डेटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

दरम्यान, रविवारी रात्री चेन्नईमध्ये पुष्पा 2 चे नवीन गाण्याच्या लाँचिंगच्या वेळी उपस्थित असलेल्या रश्मिकाने लग्न आणि प्रेमाबद्दल खुलासा केला. कार्यक्रमादरम्यान, होस्टने रश्मिकाला तिच्या लग्नासंदर्भात प्रश्न विचारला. तथापी, रश्मिकाने होस्टला उत्तर दिले आणि 'प्रत्येकाला याबद्दल माहिती आहे', असं म्हटलं. तिच्या या उत्तराने प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. 'तुला काय उत्तर हवंय ते मला चांगलं माहीत आहे', असंही रश्मिका म्हणाली. यानंतर होस्टने तिच्या उत्तरावर आणखी काही माहिती देण्यास सांगितले. तेव्हा रश्मिका म्हणाली, 'आता यावर बोलू नकोस, मी तुला नंतर वैयक्तिकरित्या सांगेन.' (हेही वाचा -लवकरच अभिनेता Vijay Deverakonda आणि अभिनेत्री Rashmika Mandanna अडकणार विवाहबंधनात? फेब्रुवारीमध्ये साखरपुडा होण्याची शक्यता)

रश्मिका आणि विजय देवरकोंडा एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या. दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगले असून अद्याप काहीही उघड केलेले नाही. विजयने नुकतेच कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पुष्टी केली की, तो रिलेशनशिपमध्ये आहे. तो म्हणाला, 'मी 35 वर्षांचा आहे. तुला वाटतं की मी अविवाहित राहीन? आपल्या सर्वांना कधी ना कधी लग्न करावेच लागते.' (हेही वाचा - The Family Star मधील 'त्या' डायलॉगमुळे Vijay Deverakonda होतोय ट्रोल, (Watch Video))

विजय आणि रश्मिका मंदान्ना यांनी गीता गोविंदममध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले आणि त्यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मनं जिंकली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, त्यांच्या नात्याच्या अफवा उडू लागल्या. 2019 मध्ये रश्मिका आणि विजयने डिअर कॉम्रेडमध्येही काम केले. आता रश्मिका पुष्पा 2 मध्ये दिसणार असून अल्लू अर्जुनसोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपचं आवडत आहे.