Ranveer Singh Nude Photos (संग्रहित संपादित प्रतिमा)

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या त्याच्या बोल्ड फोटोशूटमुळे (Bold Photo-shoot) चर्चेत आहे. जेव्हापासून अभिनेत्याने हे फोटोशूट केले आहे, तेव्हापासून अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अभिनेत्याचे न्यूड फोटो समोर आल्यापासून त्याला ट्रोल केले जात आहे, एवढेच नाही तर त्याच्यावर अनेक प्रकारचे मीम्सही व्हायरल होऊ लागले आहेत. आता अभिनेता रणवीर सिंगवर न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, 'महिलांच्या भावना दुखावल्याबद्दल' अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीबाबत अधिक माहिती अद्याप समजू शकलेली नाही. रणवीर सिंगच्या नग्न फोटोशूटबद्दल अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्याचे समर्थन केले असताना, टीएमसी खासदार आणि बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांनी विचारले की, ‘महिलांनी असे फोटो शेअर केले असते तर त्यांचे कौतुक झाले असते का?’

हे फोटोशूट व्हायरल झाल्यानंतर आता यावर राजकारणही सुरू झाले आहे. अभिनेत्याच्या छायाचित्रांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रमुख अबू आझमी यांनी ट्विट केले होते. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘सार्वजनिक ठिकाणी नग्न राहणे ही 'कला' आणि 'स्वातंत्र्य' आहे, मग हिजाब घालणे म्हणजे ‘दबाव टाकणे’ का?’ (हेही वाचा: अभिनेत्री कैटरीना कैफ आणि विकी कौशलला धमकी देणाऱ्यास अटक)

दरम्यान, रणवीर सिंगने हे फोटोशूट पेपर मॅगझिनसाठी केले आहे. या फोटोंमध्ये रणवीर सिंग टर्किश गालिच्यावर पडून जबरदस्त पोज देताना दिसत आहे. त्याचे फोटोशूट बर्ट रेनॉल्ड्सपासून (Burt Reynolds) प्रेरित आहे, ज्याने कॉस्मोपॉलिटन मासिकासाठी असेच न्यूड फोटोशूट केले होते. बर्ट रेनॉल्ड्सला  श्रद्धांजली म्हणून रणवीरने हे फोटोशूट केल्याचे सांगण्यात आले होते.