कान्समधील दीपिकाच्या लूकवर प्रभावित होऊन रणवीरच्या आयुष्यात आली एक क्यूट परी, रणवीरने शेअर केला सोशल मिडियावर ह्या क्यूट मुलीचा फोटो
दीपिकाच्या कान्समधील लूकने घायाळ झालेल्या रणवीर सिंह ने दिपिकाच्या रुपात एका गोड अशा छोट्या मुलीचा फोटो शेअर केला आहे.
ह्या जगात अभिनेत्री दीपिका पदुकोणचा(Deepika Padukone) सर्वात मोठा डायहार्ट फॅन असेल तर तो तिचा नवरा खुद्द रणवीर सिंग(ranveer singh). अनेक सोहळ्यांमध्ये त्याने त्याची कबुलीही दिली आहे. त्यातच भर म्हणून सध्या चर्चेत असलेल्या दीपिकाच्या लूकने घायाळ झालेल्या रणवीर सिंह ने दिपिकाच्या रुपात एका गोड अशा छोट्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. स्नॅपचॅट फिल्टरचा उपयोग करुन आपल्या लाडक्या पत्नीचे सौंदर्यांवर चार चांद लावले आहेत.
अलीकडेच झालेल्या कान्स फेस्टिवलमध्ये दीपिकाने 'लाइम ग्रीन' रंगाचा वेश परिधान केला होता. त्यात ती इतकी सुंदर दिसत होती की त्याची चर्चा देश-विदेशापर्यंत रंगली. दिपिकाच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे. मात्र ह्या लिंबू रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य आणखीनच खुलून आले होते.
तिच्या त्या अदांवर फिदा होऊन तिच्या लाडक्या नवरोबाने म्हणजेच रणवीर सिंह ने स्नॅपचॅटद्वारे बेबी फिल्टरचा वापर करुन तिचा एक छोट्या मुलीचा रुपात फोटो तयार केला आणि तो फोटो सोशल मिडियावर शेअर देखील केला. त्या फोटोला अनेकांनी पसंतीची पावती दिली. ह्या फोटोसह रणवीर अनेक इमोजीसह दिले असून दीपिकाला टॅग केले आहे.
मुंबईत मैत्रीणीच्या लग्नात दीपिका पादुकोण हिने घातलेली साडी चक्क 1.25 लाख रुपयांची!
मागील वर्षी ही जोडी विवाहबंधनात अडकली होती. सध्या रणवीर आपल्या आगामी चित्रपट '83' मध्ये व्यस्त आहे. ह्या चित्रपटात कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 1983 च्या विश्व कपमध्ये वेस्ट इंडिजला हरवून कसा विजय मिळवला हे दाखविण्यात आले आहे. रिलायन्स एन्टरटेनमेंट प्रस्तुत ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2020 मध्ये प्रदर्शित होईल.