Ranbir Kapoor ला कोविड 19 ची लागण? Randhir Kapoor यांनी रणबीर च्या आरोग्याबाबत दिली ही महत्त्वाची माहिती

मीडीया रिपोर्ट्स नुसार रणबीर कपूर कोविड पॉझिटिव्ह असून क्वारंटीन असल्याचं सांगितलं जात आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Photo Credits: Twitter

भारतामध्ये बरोबर वर्षाभरापूर्वी सुरू झालेले कोविड 19 संकट अद्यापही शमलेले नाही. सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटी, राजकारणी लोकं देखील कोरोना वायरसच्या विळख्यात सापडली. बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन ते वरूण धवन पर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली. आता बॉलिवूड मधील नव्या फळीतील तरूणाईच्या गळ्यातला ताईत अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) देखील कोरोनाच्या विळख्यात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मीडीया रिपोर्ट्स नुसार तो कोविड पॉझिटिव्ह असून क्वारंटीन असल्याचं सांगितलं जात आहे.

पिंकविला या पोर्टल सोबत रणबीरचे काका आणि अभिनेते रणधीर कपूर यांनी बोलताना - 'रणबीरची प्रकृती ठीक नाही पण त्याला नेमकं काय झालंय हे मला ठाऊक नसल्याचं' म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वी रणबीरची आई नीतू सिंग यांना देखील 'जुग जुग जियो' च्या सेट्सवर कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने त्यांनी या आजारावर मात केली आहे. नक्की वाचा: Saif Ali Khan ने घेतला कोविड-19 लसीचा पहिला डोस; पहा Photos.

 

रणबीर सध्या कामामध्ये व्यग्र आहे. त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. आगामी काही दिवसांत तो 'ब्रम्हास्त्र' सिनेमामध्ये झळकणार आहे. सोबतच लव रंजन यांच्या अनटायटल्ड सिनेमा मध्येही त्याचा समावेश आहे. या सिनेमामध्ये रणबीर अभिनेत्री श्रद्धा कपूर सोबत स्क्रिन शेअर करेल. तर परिणिती चोपडा सोबत 'एनिमल' सिनेमामध्येही तो झळकणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन संदीप वांगा रेड्डी करणार आहेत.

दरम्यान रणबीर आणि आलिया भट्ट रिलेशनशीप मध्ये आहेत. ते मागील वर्षीच लग्नबंधनात अडकण्याच्या प्लॅन मध्ये होते असे त्याने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. पण कोविड 19 संकटामुळे त्याचं लग्न पुढे ढकलल्याचं म्हटलं जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif