Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 'या' दिवशी अडकणार लग्नाच्या बेडीत

17 एप्रिल रोजी एक अतिशय खाजगी विवाह नियोजित करण्यात आला आहे. ज्यामध्ये फक्त कुटुंब आणि जवळचे लोक सहभागी होणार आहेत.

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 'या' दिवशी अडकणार लग्नाच्या बेडीत
Ranbir Kapoor, Alia Bhatt (PC - Instagram)

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding: गेल्या काही आठवड्यांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाबाबत सतत चर्चा होत आहे. रणबीर आणि आलिया या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मुंबईतील चेंबूर येथील आरके हाऊसमध्ये त्यांच्या लग्नाचे विधी पार पडणार आहेत. मात्र, याबाबत रणधीर कपूर यांना विचारले असता, त्यांनी याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. सर्व अटकळांच्या दरम्यान आता रणबीर आणि आलियाच्या लग्नाची तारीख आली आहे. या महिन्यात 17 एप्रिलला दोघेही सात फेरे घेणार आहेत.

रणबीर आणि आलियाचे लग्न हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारे लग्न ठरणार आहे. ई-टाइम्सने आपल्या अहवालात जोडप्याच्या जवळच्या एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, रणबीर-आलिया 17 एप्रिल रोजी लग्न करणार आहेत. आलियाच्या आजोबांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे हे जोडपे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात लग्न करण्याच्या विचारात होते. (हेही वाचा - Yami Gautam: यामी गौतमचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक, ट्वीट करत सतर्क राहण्यास सांगितले)

सूत्राने सांगितले की, “आलियाचे आजोबा एन राझदान यांना तिचे रणबीरसोबत लग्न बघायचे आहे. 17 एप्रिल रोजी एक अतिशय खाजगी विवाह नियोजित करण्यात आला आहे. ज्यामध्ये फक्त कुटुंब आणि जवळचे लोक सहभागी होणार आहेत. हे लग्न आरके स्टुडिओमध्ये होणार असून अशी कोणतीही वेगळी योजना अद्याप बनवण्यात आलेली नाही."

लग्नात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांच्या यादीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. लग्नाचे विधी एक-दोन दिवसचं होणार आहेत. याआधी रणबीर आणि आलिया राजस्थानच्या उदयपूरमध्ये लग्न करू शकतात, अशीही चर्चा होती. उदयपूरला जाताना दोघेही अनेकदा दिसले होते.

दोन्ही कलाकार चित्रपटांमध्ये व्यस्त -

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणबीर आणि आलिया दोघेही सध्या खूप व्यक्त आहेत. दोघांनी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र काम केले आहे. याशिवाय आलियाकडे 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'डार्लिंग्स' आहेत. तर रणबीर 'शमशेरा' चित्रपटात दिसणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 04, 2022 09:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).