Rakul Preet Singh’s Brother Aman Arrested: रकुल प्रीत सिंगचा भाऊ अमन प्रीत सिंगला ड्रग्ज प्रकरणात अटक, हैदराबाद पोलीस करणार चौकशी

अमनला नुकतीच ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी पाच जणांना पेडलिंग अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

Rakul Preet Singh’s Brother Aman Arrested (PC - Instagram)

Rakul Preet Singh’s Brother Aman Arrested: हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad Police) बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh)चा भाऊ अभिनेता अमन प्रीत सिंग (Aman Preet Singh) ला अटक (Arrest) केली आहे. सायबराबाद पोलिसांच्या अखत्यारीतील नार्कोटिक्स ब्युरो (Narcotics Bureau) आणि राजेंद्र नगर एसओटी पोलिसांच्या संयुक्त कारवाईनंतर अमनला ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case) अटक करण्यात आली. भावाच्या अटकेबाबत रकुल प्रीत सिंगने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अमन प्रीत सिंगला ड्रग्ज प्रकरणात अटक -

या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी पोलिसांनी सोमवारी हैदराबाद येथे पत्रकार परिषद घेतली. अमनला नुकतीच ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी पाच जणांना पेडलिंग अंतर्गत अटक करण्यात आली आहे. मात्र अमनचे नाव ड्रग्ज सेवन करणाऱ्या आणि पॉझिटिव्ह आढळलेल्या 13 जणांच्या यादीत आहे. अमन प्रीत सिंगला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची पुष्टी पोलिसांनी दिली. (हेही वाचा -Rakul Preet Singh Hot Pics: अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने शेअर केले हॉट फोटो, स्टाईल पाहून चाहते फिदा)

पहा व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

पोलिसांनी सांगितले की, 'प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतरच अमनचा कोणाशी संबंध आहे यावर मी भाष्य करण्यात येईल. काही भारतीय आणि नायजेरियन लोकांचा समावेश असलेल्या आरोपींसोबत त्याचे संबंध कधी सुरू झाले याचा तपास करणे आवश्यक आहे. त्यापैकी काही पुनरावृत्तीचे गुन्हेगार आहेत. कोकेन सेवनासाठी अमनची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.'