Rakhi Sawant Pregnancy: आदिलने बळजबरी केल्यानंतर राखी सावंत राहिली होती प्रेग्नंट; अभिनेत्रीने केला मोठा खुलासा
परिणामी राखी गरोदर राहिली.
Rakhi Sawant Pregnancy: राखी सावंत (Rakhi Sawant) चे दु:ख कमी होण्याचं नाव घेत नाहीये. मोठमोठे दु:ख तिच्यावर एकामागून एक तुटून पडत आहे. नुकतेच राखीने आदिलबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अभिनेत्रीने तिच्या तुरुंगात असलेल्या पतीवर आरोप केला आहे की, डॉक्टरांनी नकार देऊनही आदिलने अभिनेत्रीशी संबंध ठेवले. परिणामी राखी गरोदर राहिली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राखी सावंत तिचा त्रास सांगत आहे. राखी सांगत आहे की, जेव्हा ती बिग बॉस मराठीमध्ये गेली तेव्हा ती गरोदर होती. बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी तिचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना 3 महिने संबंध ठेवण्यास मनाई केली. राखीने सांगितले की, आदिलला हे मान्य नव्हते आणि परिणामी ती गरोदर राहिली. (हेही वाचा -Shahnawaz Pradhan Passed Away: मिर्झापूर फेम अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे निधन; 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
राखीने असेही सांगितले की, आदिलने तिला हे सर्व लोकांना सांगण्यास मनाई केली होती. परंतु डॉक्टरांनी मला सांगितले की जर मी गर्भधारणा सुरू ठेवली तर माझ्या जीवाला धोका आहे. आदिलने माझी फसवणूक केली. त्यानंतर माझा गर्भपात झाला. राखी रडत रडत सांगत होती की, आदिलने मला प्रत्येक प्रकारे फसवलं. आता मी एक जिवंत प्रेत बनले आहे.
अलीकडेच, मुंबईच्या दिंडोशी सत्र न्यायालयाने राखी सावंतचा पती आदिल दुर्राणीची पोलीस कोठडी रद्द करण्याचा अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाचा आदेश रद्द केला आहे. सावंत यांनी फिर्याद दिल्यानंतर आदिल दुर्राणीला ओशिवरा पोलिसांनी 7 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. राखीने आरोप केला आहे की आदिलने तिच्यावर हल्ला केला. तिच्या नकळत तिच्या फ्लॅटमधून पैसे आणि दागिने घेतले. तसेच तिच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले.