लग्नानंतर पहिल्यांदा राखी सावंतने शेअर केला आपल्या मुलीचा व्हिडिओ? (Watch Video)

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत नेहमीचं सोशल मीडियावर चर्चेत असते. राखी सावंत हिने लग्न केल्याच्या गोष्टीचा खुलासा केल्यानंतर तिचा नवरा नेमका कोण हे अद्यापही कोणाला कळले नाही. मात्र, आता राखीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या लहान मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Rakhi Sawant Daughter (PC - Instagram)

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीचं सोशल मीडियावर चर्चेत असते. राखी सावंत हिने लग्न केल्याच्या गोष्टीचा खुलासा केल्यानंतर तिचा नवरा नेमका कोण हे अद्यापही कोणाला कळले नाही. मात्र, आता राखीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. मित्रांनो आणि माझ्या चाहत्यांनो, ही माझी मुलगी आहे. तिला प्लीज आशीर्वाद द्या, असं कॅप्सनही राखीने दिलं आहे. या व्हिडिओवरून नेटीझन्सनी राखीला चांगलेच सुनावले आहे. (हेही वाचा - बिग बॉसच माझा पहिला नवरा, सीझन 1 मध्ये लग्न झाल्याचा राखी सावंत हिचा दावा (Watch Video)) हा व्हिडिओ पाहून राखीच्या अनेक चाहत्यांनी तिची प्रशंसा केली असून काहींनी मात्र तिला ट्रोल केलं आहे. काही नेटीझन्सनी ही तुझी मुलगी नसल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी ही स्व:राखीचं असल्याचं म्हटलं आहे. या व्हिडिओमध्ये राखीने बेबी फिल्टर वापरलं आहे. त्यामुळे ती लहान मुलीसारखी दिसत आहे. या व्हिडिओमध्ये राखी म्हणते की, 'हाय...फ्रेंड्स तुम्ही मला ओळखलंत का? मी राखी सावंतची मुलगी आहे. तुम्ही माझी आई राखीला खूप पसंत करतात. त्यामुळेच आज मी माझी आईच्या फोनवर व्हिडिओ बनविला आहे.'

राखी सावंत इन्स्टाग्राम पोस्ट - 

 

View this post on Instagram

 

Dosto my fans a meri beti Hai please give her your Ashirwad thanks 🙏

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राखी सावंतने बिग बॉसच माझा पहिला नवरा असल्याचं म्हटलं होतं. एवढेच नाही तर सीझन 1 मध्येच माझे लग्न झालं असल्याचा दावाही तिने केला होता. राखी नेहमीच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काहीना काही व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे आता राखीने शेअर केलेल्या या मुलीचा व्हिडिओही फेक असल्याचं नेटिझन्सचं म्हणणं आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now