Rajkummar Rao - Patralekhaa Pre-Wedding Ceremony: चंदिगढमध्ये पार पडला राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा साखरपुडा; गुडघ्यावर बसून घातली अंगठी (Watch Video and Photos)
या संपूर्ण सोहळ्यातील आकर्षण ठरले ते म्हणजे, राजकुमार रावचे पत्रालेखाला प्रपोज करणे. पत्रलेखासमोर गुडघ्यावर बसून एंगेजमेंट रिंग हातात घेऊन राजकुमारने मोठ्या प्रेमाने तिला विशारले, ‘माझ्याशी लग्न करशील?'.
अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि त्याची दीर्घकाळाची गर्लफ्रेंड पत्रलेखा (Patralekhaa) आज जीवनातली एक नवीन इनिंग सुरू करणार आहेत. 14 नोव्हेंबरला म्हणजेच आज हे दोघेही त्यांच्या इतक्या वर्षांच्या मैत्रीचे रुपांतर खास नात्यात करणार आहेत. हे दोघेही चंदीगडमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाचे सर्व विधी आज कुटुंबीय आणि काही निवडक मित्रांच्या उपस्थितीत पार पडतील. लग्नाआधी, त्यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
त्यांच्या एंगेजमेंटचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये राजकुमार पत्रलेखासमोर गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करताना दिसत आहे. हा कार्यक्रम चंदीगडचे लक्झरी रिसॉर्ट 'द ओबेरॉय सुखविलास' येथे झाला. अगदी छोटेखानी असा हा कार्यक्रम होता, ज्यासाठी जोडप्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या सोहळ्यात हुमा कुरेशी, साकिब सलीम आणि फराह खान उपस्थित होते असे समजते.
View this post on Instagram
या संपूर्ण सोहळ्यातील आकर्षण ठरले ते म्हणजे, राजकुमार रावचे पत्रालेखाला प्रपोज करणे. पत्रलेखासमोर गुडघ्यावर बसून एंगेजमेंट रिंग हातात घेऊन राजकुमारने मोठ्या प्रेमाने तिला विशारले, ‘माझ्याशी लग्न करशील?'. हा प्रस्ताव ऐकून पत्रलेखाही ताबडतोब खाली बसली आणि तिने ‘हो’ असे म्हटले. त्यानंतर जोडप्याने नृत्यही केले. यावेळी दोघेही पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसले. छायाचित्रांमध्ये पाहुणेही काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसले. यावरून लक्षात येत आहे की, सोहळ्यासाठी पांढरा-काळा थीम ठेवली होती.
View this post on Instagram
अभिनेता राजकुमार रावच्या लग्नाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हंसल मेहता दिग्दर्शित आणि 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'सिटी लाइट्स' या चित्रपटात राजकुमार-पत्रलेख यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते, ज्यामध्ये दोघांनी पती-पत्नीची भूमिका साकारली होती.
(The above story first appeared on LatestLY on Nov 14, 2021 10:21 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

