Rajinikanth Turns 70: वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत साकारले सुंदर सँडआर्ट!
त्यानिमित्ताने देशभरातील दिग्गज, चाहते यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, जन्मदिनाचे औचित्य साधत वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक याने सुंदर वाळूशिल्प साकारले आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, लता मंगेशकर यांच्या समवेत अनेक दिग्गज मंडळींनी रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर देशभरातील तमाम चाहत्यांकडून देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, रजनिकांत यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक (Sudarsan Pattnaik) यांनी सुंदर वाळूशिल्प साकारले आहे. वाळुतून साकारलेला रजनिकांत यांचा चेहरा त्याने ट्विटच्या माध्यमातून शेअर केला आहे.
सुदर्शन पटनायक यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "हॅप्पी बर्थडे सुपरस्टार रजनिकांत. भारतीय सिनेमाची शान, आयकॉनिक सुपरस्टार रजनीकांत सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझे एक सँडआर्ट. हॅप्पी बर्थडे थलायवा." (तामिळ सुपरस्टार रजनीकांत लवकरच स्थापन करणार आपला नवा राजकीय पक्ष, 31 डिसेंबरला करणार मोठी घोषणा)
Sudarsan Pattnaik Tweet:
बॉलिवूड आणि दक्षिणात्य कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात शत्रुघ्न सिन्हा, किच्चा सुदीप, महेश बाबू यांच्यासमवेत अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. दरम्यान, रजनिकांत लवकरच आपला नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. त्यासंदर्भात मोठी घोषणा 31 डिसेंबरला करणार असल्याचे खुद्द रजनीकांत यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. (Happy Birthday Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त सुदर्शन पटनायक यांनी साकारलं सुंदर वाळूशिल्प!)
सुदर्शन पटनायक यांची वाळूशिल्प अतिशय प्रसिद्ध आहेत. थोरामोठ्यांचे वाढदिवस, विशेष दिन यानिमित्ताने क्रिएटीव्ह शिल्प साकारत ते शुभेच्छा देत असतात. तसंच सामाजिक विषयावर भाष्य करणारं शिल्प साकारुन सर्वांचे लक्ष वेधून घेतात.