Happy Birthday Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त सुदर्शन पटनायक यांनी साकारलं सुंदर वाळूशिल्प!
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 78 वा वाढदिवस. वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी सुंदर Sand Art साकारुन बिग बी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज 78 वा वाढदिवस. बिग बी (Big B) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक (Sudarsan Pattnaik) यांनी सुंदर Sand Art साकारुन बिग बी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुदर्शन पटनायक ओडिसा (Odisha) येथील सुप्रसिद्ध वाळू शिल्पकार आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक राजकीय नेते, क्रिडापटू, बॉलिवूड स्टार्स यांचे वाळूशिल्प साकारले आहे. तसंच अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करणारे शिल्प साकारूनही त्यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. यासाठी त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आता बिग बीं च्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ओडिसा येथील पुरी बीचवर (Puri Beach) सुंदर वाळूशिल्प साकारले आहे.
आपल्या कलाकृतीचा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले, "बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ओडिसाच्या पुरी बीचवरील माझे वाळूशिल्प." या वाळू शिल्पात तुम्ही पाहु शकाल 78 या आकड्यामध्ये बीग बींच्या चेहरा साकारण्यात आला असून बाजूला 'बीग बी हॅप्पी बर्थडे' असे लिहिण्यात आले आहे. आपल्या कलेतून भावना व्यक्त करण्याच्या आपल्या परंपरेत सुदर्शन पटनायक यांनी यंदाही खंड पडू दिलेला नाही. (पद्मश्री विजेते वाळू शिल्पकार Sudarsan Pattnaik यांची आकर्षक कलाकृतीतून ऋषि कपूर यांना श्रद्धांजली, View Pic)
पहा पोस्ट:
#HappyBrithDayBigB Bollywood legend #AmitabhBachchan Ji. My SandArt at Puri beach in Odisha . pic.twitter.com/xrB4BBGK2s
— Sudarsan Pattnaik (@sudarsansand) October 11, 2020
बिग बी कोरोना व्हायरस संसर्गावर मात करुन परतल्यानंतर देखील सुदर्शन पटनायक यांनी वाळूशिल्प साकारले होते. जुलै महिन्याच्या मध्यात अमिताभ बच्चन यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही काळाने कोरोनावर मात करुन परतलेल्या बीग बी यांच्या स्वागतासाठी Sand Art साकारण्यात आले होते. 'वेलमक बॅक अमिताभ बच्चन, तुम्हाला चांगले आरोग्य आणि सदैव आनंद लाभो,' अशा मेसेजसह ते शेअर करण्यात आले होते.
(The above story first appeared on LatestLY on Oct 11, 2020 04:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

