Rajinikanth Emotional Note After Getting Discharged: डिस्चार्ज मिळाल्यानंतर रजनीकांत यांची भावनिक पोस्ट; पंतप्रधान मोदींसह मानले सर्व चाहत्यांचे आभार
आता रुग्णालयातून घरी पोहोचताच रजनीकांत यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. एवढेच नाही तर रजनीकांतने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट एक्स वर एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे.
Rajinikanth Emotional Note After Getting Discharged: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना 30 सप्टेंबर रोजी चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्याच्यावर येथे उपचार करण्यात आले. मात्र, आता रजनीकांत पूर्णपणे बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. रजनीकांत यांच्या आजारपणाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. रजनीकांत आजारी पडताच, पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यापर्यंत सर्वांनी त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आता रुग्णालयातून घरी पोहोचताच रजनीकांत यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. एवढेच नाही तर रजनीकांतने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट एक्स वर एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी राजकारणी आणि चाहत्यांचे त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी केलेल्या प्रार्थनांसाठी आभार मानले आहेत.
रजनीकांत यांनी तमिळ भाषेत शेअर केलेल्या या नोटमध्ये लिहिले की, 'मी राजकारणी, सिनेसृष्टीतील सहकारी, माझे मित्र आणि हितचिंतकांचे आभार मानतो. प्रसारमाध्यमांचेही मनःपूर्वक आभार. तसेच माझ्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार. यासोबतच माझ्या चाहत्यांचे विशेष आभार ज्यांनी मला सर्व काही दिले.' (हेही वाचा -Govinda Discharged From Mumbai Hospital: गोविंदाला मुंबईच्या रुग्णालयातून डिस्चार्ज; चाहत्यांचे मानले आभार, पाहा व्हिडिओ)
डिस्चार्ज मिळाल्यानंतर रजनीकांत यांची भावनिक पोस्ट -
प्राप्त माहितीनुसार, रजनांतच्या हृदयाशी जोडलेल्या एका रक्तवाहिनीला सुज आली होती. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. येथे शस्त्रक्रियेविना त्यांच्यावर जवळपास 3 दिवस उपचार सुरू होते. आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नॉनसर्जिकल प्रक्रियेद्वारे ही सूज कमी केली गेली. आता रजनीकांत पूर्णपणे बरे असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. (हेही वाचा - अभिनेता गोविंदा याची प्रकृती सुधारली, चाहत्याने घराबाहेर झळकावले पोस्टर)
रजनीकांत यांचा 'वेट्टियान' हा चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात रजनीकांतसोबत अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रजनीकांत आणि अमिताभ बच्चन 33 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. याआधी दोघेही 1991 मध्ये आलेल्या 'हम' चित्रपटात एकत्र काम करताना दिसले होते. आता या चित्रपटातही हे दोन सुपरस्टार आमनेसामने दिसणार आहेत.