अभिनेता गोविंदा याची प्रकृती सुधारली, चाहत्याने घराबाहेर झळकावले पोस्टर
एका चाहत्याने अभिनेता गोविंदा याची प्रकृती सध्याचांगली असल्याची माहिती चक्क एक बॅनर झळकवून दिली आहे. या बॅनरवर काही फोटो आहे. तसेच, परमेश्वर आपल्याला सतत हसतखेळत आणि आरोग्यदायी ठेवो, अशी भावनाही व्यक्त करण्यात आली आहे.
अभिनेता गोविंदा पायाला गोळी लागल्याने जखमी झाला आहे. सध्या तो रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. त्याच्या पत्नीनेही त्याच्या वैद्यकीय उपचार आणि आरोग्याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, एका चाहत्याने अभिनेता गोविंदा याची प्रकृती सध्याचांगली असल्याची माहिती चक्क एक बॅनर झळकवून दिली आहे. या बॅनरवर काही फोटो आहे. तसेच, परमेश्वर आपल्याला सतत हसतखेळत आणि आरोग्यदायी ठेवो, अशी भावनाही व्यक्त करण्यात आली आहे. गुंजन पाटील नामक व्यक्तीने हे पोस्टर झळकावले असून त्याने खाली आपला फोन क्रमांकही लिहीला आहे. या पोस्टरचा एक व्हिडिओ abdulkadir_shaikh नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.
चाहत्याकडून अभिनेता गोविंदाला शुभेच्छा!
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2024 06:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

