Jagadeesh Prathap Bandari Arrested: ज्युनियर आर्टिस्टच्या आत्महत्येप्रकरणी 'पुष्पा' चित्रपटातील अभिनेता जगदीश प्रताप बंडारीला अटक

यानंतर पंजागुट्टा पोलिसांनी बुधवारी अभिनेत्याला अटक केली.

Jagadeesh Prathap Bandari (Photo Credit - X/@MilagroMovies)

Jagadeesh Prathap Bandari Arrested: अल्लू अर्जुन (Allu Arjun) च्या 'पुष्पा' (Pushpa) चित्रपटात दिसलेला अभिनेता जगदीश प्रताप बंडारी (Jagadeesh Prathap Bandari) अडचणीत सापडला आहे. हैदराबादच्या पुंजागुट्टा पोलिस स्टेशनमध्ये जगदीशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिला ज्युनियर आर्टिस्टला धमकावून तिचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप अभिनेत्यावर करण्यात आला आहे.

जगदीशच्या छळाला कंटाळून महिला ज्युनियर आर्टिस्टने 29 नोव्हेंबरला गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पंजागुट्टा पोलिसांनी बुधवारी अभिनेत्याला अटक केली. पोलिसांना त्यांच्या तपासात आढळून आले की 27 नोव्हेंबर रोजी ही महिला जगदीशसोबत होती. तेव्हा अभिनेत्याने तिचे काही फोटो काढले होते. याबाबत महिलेला माहिती नव्हती. (हेही वाचा - Pushpa 2-The Rule Teaser: अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी येणार 'पुष्पा 2'चा टीझर; 'ही' अभिनेत्री साकारणार महत्त्वाची भूमिका)

जगदीशला न्यायालयीन कोठडी -

यानंतर जगदीशने महिलेला धमक्या देण्यास सुरुवात केली. या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून जगदीशविरुद्ध पुंजागुट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून जगदीश फरार होता. मात्र बुधवारी पोलिसांनी या अभिनेत्याला शोधून अटक केली. आता जगदीश न्यायालयीन कोठडीत आहे.

जगदीश प्रताप बंडारी 'पुष्पा' चित्रपटात दिसला होता. चित्रपटात, अभिनेत्याने साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन सोबत महत्त्वाची भूमिका साकारली होती. अभिनेता पुष्पाचा जिवलग मित्र केशवच्या भूमिकेत दिसला होता. सध्या 'पुष्पा 2' चे शुटींग सुरू आहे. जगदीशने 2029 साली तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. निरुद्योग नातुलू हा त्यांचा पहिला चित्रपट होता. यानंतर त्यांनी जॉर्ज रेड्डी आणि पलासा 1978 या चित्रपटांमध्ये काम केले. (वाचा - Pushpa 2 Update: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'बद्दल मोठी अपडेट, चित्रपटाचे शुटिंग अचानक थांबवले)

तथापी, महिला कलाकाराचा छळ केल्याच्या प्रकरणामध्ये अटक झाल्याने जगदीशच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. जगदीशच्या अटकेमुळे 'पुष्पा 2' चित्रपटाच्या शूटिंगवर परिणाम होईल की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.