Pulwama Terror Attack: जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनीही केला पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध; कराची साहित्य महोत्सवाला न जाण्याचा निर्णय

पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांनी पाकिस्तानात होणाऱ्या कराची साहित्य महोत्सवाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Javed Akhtar & Shabana Azmi (Photo Credits: Twitter)

Pulwama Terror Attack: पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि शबाना आजमी (Shabana Azmi) यांनी पाकिस्तानात होणाऱ्या कराची साहित्य महोत्सवाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. 14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे (CRPF) 40 जवान शहीद झाले. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतरच ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी ट्विट करत दौरा रद्द केल्याची माहिती दिली आहे. ('आम्ही ना विसरणार, ना माफ करणार', CRPF ची शहिदांना श्रद्धांजली)

कराची साहित्य महोत्सव 23-24 फेब्रुवारीला होणारं होतं. या महोत्सवासाठी जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पण हे आमंत्रण नाकारल्याचं जावेद अख्तर यांनी ट्विट करुन सांगितलं. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, "कराची साहित्य महोत्सवात होणाऱ्या कैफी आझमी आणि कवितांच्या कार्यक्रमासाठी मला आणि शबाना दोघांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र आम्ही तिथे जाण्याचा प्लॅन रद्द केला आहे. 1965 साली इंडो-पाक युद्धा दरम्यान कैफी आजमी यांनी कविता लिहिली होती... और फिर कृष्ण ने अर्जुन से कहा." ('भारत के वीर' या अॅप किंवा वेबसाईटवरुन शहीदांच्या कुटुंबियांना अशी करा आर्थिक मदत)

तर शबाना यांनी ट्विट करत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.

या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सामान्य नागरिक, दिग्गज, खेळाडू, राज्यकर्ते, बॉलिवूड सेलिब्रेटी विविध माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.