Priyanka Nick Wedding : Priyanka Chopra चं कन्यादान करणार 'हे' जोडपं !

2 डिसेंबरला हिंदू पद्धतीनुसार आणि 3 डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीनुसार राजस्थानमधील जोधपूरमध्ये विवाहसोहळा पार पडणार आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या लग्नसोहळा विधी (Photo credits: Yogen Shah)

Priyanka Nick Wedding :  आजपासून प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनसच्या (Nick Jonas) लग्नसोहळा विधींना सुरूवात झाली आहे. 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीनुसार आणि 3 डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीनुसार राजस्थानमधील जोधपूरमध्ये विवाहसोहळा पार पडणार आहे. जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये (Umaid Bhawan Palace)  प्रियांका -निकचा हिंदू पद्धतीने विवाहसोहळा पार पडणार आहे. निकचे कुटुंबीय अमेरिकेहून भारतामध्ये आले आहेत. भारतीय पारंपारिक कपड्यांमध्येच निकचे कुटुंबीयही सहभागी झाले आहेत. Priyanka Chopra Nick Jonas Wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज

हिंदू लग्न पद्धतीमध्ये कन्यादान (Kanyadan) हा एक महत्त्वाचा सोहळा असतो. प्रियांकाच्या वडीलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाल्याने आता प्रियांका चोप्राचे काका - काकी म्हणजे रीना (Reena Chopra) आणि पवन चोप्रा (Pawan Chopra) हे प्रियांकाचे कन्यादान करणार आहे. रीना आणि पवन चोप्रा म्हणजे परिणीती चोप्राचे आईवडील.

 

View this post on Instagram

 

Their outfits are so georgeous already... .i cant wait to se all these georgeous peoplle in the incredible Umaid Bhavan looking beautiful in these georgeous clothes.. Pc- @manav.manglani @yogenshah_s .. . . #priyankachopra #nickjonas #prick #priyankanickengagement #love #bollywood #hollywood #quantico #baywatch #newyork #nyc #la #losangeles #makeup #hair #eyes #nickyankawedding #bachelorettevibes #sophieturner #joejonas #jonasbrothers @priyankachopra @nickjonas

A post shared by Imperfect Perfections (@priyankachopra_globe) on

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 29 नोव्हेंबरला प्रियांका आणि निक जोनसच्या लग्नाचा संगीत सोहळा आहे. उमेद भवन पॅलेसच्या (Umaid Bhawan Palace)  पूर्वी मेहरानगढ़ किल्ल्याचं नाव लग्नाच्या स्थळासाठी पुढे आले होते मात्र आगामी निवडणूकांची धामधूम पाहता त्याला परवानगी नाकारली. आता प्रियांका निकच्या लग्नसोहळ्याच्या दरम्यान उमेद भवन पॅलेस परिसरात पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.