लग्नाच्या पूर्व संध्येपर्यंत प्रियांका चोप्रा करणार 'या' सिनेमाचं शूटिंग
जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये निक आणि प्रियांका चोप्राचा विवाहसोहळा 2 डिसेंबरला पार पडणार आहे.
Priyanka Nick Wedding : दीपिका रणवीर पाठोपाठ बॉलिवूडला प्रियांका (Priyanka Chopra) आणि निक जोनासच्या (Nick Jonas) लग्नाचे वेध लागले आहेत. जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये निक आणि प्रियांका चोप्राचा विवाहसोहळा पार पडणार आहे. लग्नाची लगबग सुरु असली तरीही प्रियांका चोप्रा लग्नाच्या आधीच्या रात्रीपर्यंत काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 'द स्काई इज पिंक' (The Sky Is Pink) या सिनेमाच्या शूटिंगमध्ये प्रियांका चोप्रा बिझी आहे.
रॉय कपूर फिल्म्स (Roy Kapur Films) बॅनर खाली तयार होणाऱ्या चित्रपटाची निर्मिती सिद्धार्थ रॉय कपूर (Siddharth Roy Kapur) यांनी केली आहे. सिद्धार्थ रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, "प्रियंका अद्भुत आहे. ती लग्नाच्या पूर्वसंध्येपर्यंत आमच्यासोबत शूटिंग आहे. तिच्या या ' प्रोफेशनॅलिझमची' दाद द्यायला हवी' असेही सिद्धार्थ म्हणाला. पणजीमध्ये सध्या 49 वा अंतरराष्ट्रीय भारतीय फिल्मोत्सव (49th International Indian Film Festival) सुरु आहे. यामध्ये सिद्धार्थ रॉय सहभागी झाला होता. priyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज
'द स्काई इज पिंक' चित्रपटाचे दिग्दर्शन सोनाली बोस करत आहे. सिनेमात फरहान अख्तर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सध्या या सिनेमाचं शूटिंग दिल्लीमध्ये सुरु आहे. लग्नाचं कारण देत प्रियंकाने आयत्या वेळेस सलमान खानच्या 'भारत' सिनेमातून एक्झिट घेतली होती. यानंतर प्रियांकाऐवजी अभिनेत्री कॅटरिना कैफ सलमान खानसोबत चित्रपटात झळकणार आहे.
निक जोनास या अमेरिकन पॉप स्टारसोबत प्रियांका लग्न करणार आहे. लग्नविधींच्या तयारीसाठी निक लवकरच भारतामध्ये येणार आहे. निक आणि प्रियांका आधी हिंदू तर नंतर ख्रिश्चन पद्धतीनुसार लग्न करणार आहेत.