Priyanka Chopra ने न्यूयॉर्कमध्ये उघडलं भारतीय रेस्टॉरंट; अभिनेत्रीने दिलं 'हे' नाव, जाणून घ्या कधीपासून सुरू होणार

तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तीन फोटो शेअर केले आहेत.

Priyanka Chopra New Restaurant (PC - Instagram)

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत नाव कमावणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) दररोज चर्चेत असते. तसेच ती तिच्या चाहत्यांना नेहमी वेगवेगळं सरप्राईज देत असते. पुन्हा एकदा प्रियंका चोप्राने तिच्या सर्व चाहत्यांना एक खास सरप्राईज दिले आहे. आपल्या अभिनयानंतर तिने भारतीय खाद्य परदेशात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रियंका चोप्राने न्यूयॉर्कमध्ये भारतीय रेस्टॉरंट उघडलं आहे. प्रियंकाने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर खूपचं अ‍ॅक्टिव असते. प्रियंका तिच्या चाहत्यांना आपल्या आयुष्यात काय करते आहे आणि काय करणार आहे, याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देत असते. प्रियंका चोप्राच्या भारतीय रेस्टॉरंटचे नाव सोना (Sona) असं आहे. तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तीन फोटो शेअर केले आहेत. (वाचा - Kareena Kapoor ची Instagram वर वर्षपूर्ती; खास व्हिडिओद्वारे शेअर केला प्रवास (Watch Here))

या तीन फोटोंपैकी एका फोटोत प्रियंका चोप्राच्या रेस्टॉरंटचे नाव दिसत आहे. बाकीच्या फोटोत प्रियंका पती निक जोनससबरोबर उद्घाटन पूजा करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत या अभिनेत्रीने चोप्राची लांबलचक पोस्टही लिहून सोना रेस्टॉरंटविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे. प्रियंका चोप्राने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'तुमच्यासमोर सोना सादर करताना मला आनंद झाला आहे. न्यूयॉर्क शहरातील एक नवीन रेस्टॉरंटसह मी माझ्या भारतीय अन्नावरील माझे प्रेम व्यक्त करत आहे.'

प्रियंका चोप्रा यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, 'सोना हे असं प्रतिक आहे, ज्यासोबत मी मोठी झाली आहे. या रेस्टॉरंटचे स्वयंपाकघर अत्यंत प्रतिभावान शेफ हरी नायक चालवणार आहेत. त्यांनी अतिशय चवदार आणि नाविन्यपूर्ण मेनू तयार केला आहे. जो तुम्हाला माझ्या देशाच्या अन्नाची चव देईल. सोना या महिन्यात सुरू होत आहे. यासाठी माझे मित्र मनीष गोयल आणि डेव्हिड रॉबिन प्रयत्न करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra)

प्रियंका चोप्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, सप्टेंबर 2019 मध्ये या रेस्टॉरंटची पूजा केली होती. सध्या प्रियंकाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रियांका चोप्राला तिच्या पहिल्या रेस्टॉरंटसाठी तिचे चाहते आणि सोशल मीडिया यूजर्स शुभेच्छा देत आहेत. रेस्टॉरंट्स व्यतिरिक्त ती आपल्या ‘अनफिनिश्ड’ पुस्तकासाठीही चर्चेत आहे. या पुस्तकात प्रियंका चोप्राने तिच्या जीवनाशी संबंधित अनेक कथा शेअर केल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif